महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

2 मुलांसोबत व्हॅनमध्ये राहते महिला

06:03 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हॅनमध्ये आहे किचन-बाथरुमसारखी सुविधा

Advertisement

घरांच्या किमती वाढू लागल्याने पाश्चिमात्य देशांमध्ये लोक आता व्हॅनमध्येच संसार थाटू लागले आहेत. विदेशात व्हॅनमध्ये राहण्याची संस्कृती अत्यंत जुनी आहे, आता हा प्रकार भारतातही दिसू लागला आहे. परंतु भारतात अनेक लोकांना वाहनांमध्ये राहण्याची कल्पना अद्याप अजब वाटते. एक विदेशी महिला स्वत:च्या 2 मुलांसमवेत 3 वर्षांपासून एका आरव्ही (रिक्रिअॅक्शन व्हेईकल)मध्ये राहत आहे. या व्हॅनमध्ये तिने गरजेच्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत.

रेबेका शॉ एक सिंगल मदल असून ती स्वत:च्या दोन मुलांसमवेत या व्हॅनमध्ये राहते. तिच्या इन्स्टाग्रामवर 33 हजार फॉलोअर्स तर टिकटॉकवर 3 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे सर्व जण तिच्या लाइफस्टाइलने प्रेरित झालेले आहेत.   2021 पासून रेबेका या व्हॅनमध्ये मुलांसोबत राहते. या व्हॅनमुळे तिची मोठी बचत झाली आहे. ती एक इंटीरियर डिझाइनर असल्याने तिची कमाई होते.
Advertisement

3 वर्षांमध्ये माझे घरभाड्याचे एक कोटी रुपये वाचले आहेत असे तिने सांगितले. तिच्या आरव्ही व्हॅनचे नाव फॉरेस्ट रिव्हर हेरिटेज ग्लेन 378एफल आहे. ही डबल स्टोरी व्हॅन आहे. व्हॅनच्या वरच्या भागात मुलांसाठी बेड आहेत. खाली रेबेकासाठी एक मोठी बेडरुम असून यातही बेड आहे. याचबरोबर तिची एक छोटी ऑफिस स्पेस आहे. तिच्या घरात वॉशिंग मशीन, किचन, बाथरुम आणि ड्रॉइंग रुम देखील आहे. तिने व्हॅनला अत्यंत सुंदरपणे सजविले आहे. तिच्या या व्हॅन टूरचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याला 1 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. ही व्हॅन कमी आणि घर अधिक वाटत असल्याचे एकाने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article