पिंगुळीत कारच्या धडकेत महिला जागीच ठार
मुंबई -गोवा महामार्गावरील घटना
कुडाळ -
मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारची जोराची धडक बसून पादचारी श्रीमती आशा सोनू धुरी ( 65, रा. पिंगुळी- धुरीटेंबनगर ) या जागीच ठार झाली.ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.त्या घाट जात असताना ही घटना घडली.श्रीमती धुरी या आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे चालत घरकामाला जात होत्या. महामार्गावर पिंगुळी- मोरजकरवाडी येथे मुबईहुन दोडामार्ग - सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती सुझूकी एक्स. एल 6 कारची पादचारी श्रीमती धुरी यांना जोराची धडक बसली.यात त्या जागीच ठार झाल्या. धडकेनंतर सदर कार साधारण 35 ते 40 मीटर अंतरावर जाऊन थांबली.घटना पिंगुळी- धुरीटेंबनगर व मोरजकरवाडी येथील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. कुडाळ पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.या घटनेने पिंगुळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होती.