कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसस्थानक इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी

11:29 AM Mar 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण येथील दुर्घटना

Advertisement

मालवण / प्रतिनिधी
मालवण येथील जुन्या बस स्थानक इमारतीचे स्लॅब डोक्यावरकोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. गाडीची वाट बघत बसलेल्या या महिलेच्या डोकी वर स्लॅबचा तुकडा पडल्याने ही दुर्घटना घडली. सदर जुनी इमारत जीर्ण झाली असून ती पाडण्याची कारवाई अद्याप करण्यात येत नसल्याने वारंवार दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नवीन बस स्थानक इमारत बांधून पूर्ण झाली असून काही किरकोळ कामे शिल्लक राहिल्याने सदरची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे प्रवाशांना जुन्याच बसस्थानक इमारतीत थांबून रहावे लागत आहे. आणि दुर्घटनेला बळी पडावे लागत आहे. यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # sindhudurg news # malvan bus stand # accident # news update #
Next Article