महिलेला विचित्र आजार
केवळ निम्मा चेहराच होतो लाल, निम्मा पडतो कोरडा
मानवी शरीराला अनेक प्रकारचे रोग होत असतात. यातील काही उपचारहीन आहेत तर काही रोग हे लाखो लोकांमध्ये एकालाच होत असतात. अशाप्रकाच्या आजारांवर उपचार अत्यंत अवघड असतो. तर काही अत्यंत स्थायी किंवा अस्थायी असूनही जीवघेणी स्थिती निर्माण करत नाहीत. अशीच एक दुर्लभ परंतु हैराण करणारी ‘हेल्थ कंडीशन’ असून याला हार्लेक्विन सिंड्रोम म्हटले जाते. फिजिकल थेरपिस्ट सिडनी पॅट्रिस या आजाराने ग्रस्त आहे.
बाल्टीमोर येथील 26 वर्षीय फिजिकल थेरपिस्ट सिडनीने या विकाराविषयी सांगितले आहे. ही एक मेंदूच्या नसांच्या सिस्टीमची स्थिती आहे. यात चेहरा अर्धा लाल आणि घामाने ओला होतो, तर दुसरा हिस्सा पूर्णपणे कोरडा असतो. व्यायामादरम्यान माझा निम्मा चेहरा लाल होता, हा हिस्सा घामाने ओला होता, तर चेहऱ्याचा दुसरा हिस्सा पांढरा न् कोरडा राहतो असे तिने सांगितले आहे. मागील वर्षी मानेवरील शस्त्रक्रियेत एक नस खराब झाली. याचमुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे तिने सागितले. हे न्यूरोसिस्टीमच्या नुकसानीमुळे घडते. ही सिस्टीम आमच्या ‘लढा किंवा पळा’ प्रतिक्रियेला नियंत्रणात ठेवते. तणावात आमचे डोळे मोठे होतात, चेहरा लाल होतो, घाम फुटतो, तोंड कोरडे पडू लागते असे न्यूरोसर्जन डॉ. बेट्सी ग्रंच यांचे सांगणे आहे.
दोन प्रकारच्या कंडीशन
हे सर्व कण्यासमोर असलेल्या सिम्पथी चेनद्वारे होते. जेव्हा ही चेन हानीग्रस्त होते, तेव्हा दोन समस्या होऊ शकतात, पहिली हॉर्नर सिस्टीम असून यात पापण्या झुकतात, बुब्बुळं आपुंचित पावतात आणि चेहऱ्याचा एक हिस्सा घामाशिवाय राहतो. दुसरी कंडीशन हार्लेक्विन सिंड्रोम असून यात चेहरा निम्मा लाल आणि घामाने ओला होतो. तर दुसरा हिस्सा कोरडा राहतो.
असे कधी घडू शकते?
दोन्ही बाजूला सिम्पथी चेन असतात, प्रत्येक चेन चेहऱ्याच्या एका हिस्स्याला नियंत्रित करते, जर एकाबाजूला नुकसान झाले, तर केवळ तोच हिस्सा प्रभावित होतो. ही स्थिती सर्वसाधारणपणे मानेवरील शस्त्रक्रियेमुळे घडू शकते. यात कण्यासमोरील हिस्स्यावर शस्त्रक्रिया होते असे डॉ. ग्रंच यांनी सांगितले आहे.
फारच कमी लोकांना ही समस्या
हा आजार अत्यंत दुर्लभ आहे. अमेरिकेत 1 हजारपेक्षा कमी लोक यामुळे प्रभावित आहेत. याविषयी पहिला अहवाल 1988 मध्ये समोर आला होता. हार्लेक्विन सिंड्रोम सर्वसाधारणपणे अस्थायी आणि हानिरहित आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये लक्षणे स्थायी असू शकतात. सिडनीला बहुधा दोन्ही सिंड्रोम आहेत. हे असाधारण आहे, कारण दोन्हींमध्ये सिम्पथी चेनची ईजा सामील आहे. सिडनीच्या कहाणीने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. लोकांना ही अनोखी स्थिती आश्चर्यकारक वाटली आहे. हार्लेक्विन सिंड्रोम गंभीर नाही, परंतु हे जीवनाला असहज करू शकते.