For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

15 वर्षांपासून बेबी पावडर खातेय महिला

06:11 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
15 वर्षांपासून बेबी पावडर खातेय महिला
Advertisement

दरदिनी संपविते एक डबा

Advertisement

जगात लोकांना अजब प्रकारच्या सवयी असतात, परंतु 44 वर्षीय लिसा एंडरसनच्या सवयीमुळे सर्वजण चकित झाले आहेत. ही महिला मागील 15 वर्षांपासून दररोज बेबी पावडर फस्त करत आहे. एका दिवसात ती 200 ग्रॅमचा पूर्ण डबा संपविते. या अनोख्या सवयीकरता आतापर्यंत तिने जवळपास 10 लाख रुपये खर्च केले आहेत.

लिसा 5 अपत्यांची आई आहे. ही सवय मला सर्वात छोट्या मुलाच्या जन्मानंतर जडली. मुलाला  स्नान घातल्यावर बेबी पावडर लावत असताना अचानक मला पावडरची चव घेण्याची तीव्र इच्छा झाली. प्रारंभी केवळ चव घेण्याची इच्छा होती, परंतु हळूहळू याची सवयच जडल्याचे लिसा सांगते.

Advertisement

दररोजची गरज

आता माझे जीवन बेबी पावडरच्या अवतीभवती फिरत आहे. मी दर 30 मिनिटांनी थोडी पावडर खात असते. दिवसात अनेकदा बाथरुमला जाते, जेणेकरून कुणी पाहू नये. रात्रीही अनेकदा उठून पावडर खात असते. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ झाल्यास मी अस्वस्थ, घबराट आणि चिडचिडी होऊ लागते. बाहेर जाताना मी मिंट्सचा वापर करते. या सवयीमुळे मी अनेकदा नाश्ता आणि दुपारचे जेवण करणे टाळते आणि केवळ एकदाच रात्री जेवते असे लिसांचे सांगणे आहे.

मोठा खर्च

15 वर्षांमध्ये लिसाने बेबी पावडरवर जवळपास 10 लाख रुपये खर्च केले आहेत. पूर्वी ती एकाच कंपनीची पावडर खात होती, परंतु आता तिला कुठल्याही ब्रँडची पावडर चालते. लिसाला पिका नावाचा डिसऑर्डर असून जो खाण्याच्या गडबडीशी निगडित आहे. यात लोक खाद्यपदार्थांसोबत माती, चॉक, पावडर, केस, कागद यासारखे बिगर खाद्य वस्तू खाण्याची तीव्र इच्छा अनुभवत असतात. हे अनेकदा आयर्नची कमतरता, पोषणसंबंधी त्रुटी, ओसीडी किंवा मानसिक तणावामुळे घडते. पिका गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. बेबी पावडरमध्ये टॅल्क असते, ज्याचे सातत्याने सेवन केल्याने फुफ्फुसं, पोट आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचू शकते असे डॉक्टरांचे सांगणे आहे.

लिसाची समस्या

या सवयीपासून मी मुक्तता मिळवू इच्छिते, परंतु स्वत:ला नियंत्रण ठेवता येत नाही. दोन दिवसांपर्यंत पावडर न खाल्यावर मला मोठा त्रास झाला होता. कुटुंबीय देखील या सवयीमुळे त्रस्त झाल्याचा खुलासा लिसाने केला आहे.

Advertisement
Tags :

.