महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंध्रप्रदेशात महिला डॉक्टरवर हल्ला

06:22 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तिरुपति येथील श्री वेंकटेश्वर इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये एक रुग्ण महिला डॉक्टरवर हल्ला करताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रुग्ण महिला डॉक्टरचे केस खेचत असल्याचे आणि बेडच्या स्टील फ्रेमवर तिचे डोकं आपटताना दिसून आला आहे.

Advertisement

रुग्णाकडून हल्ला झाल्यावर वॉर्डमध्ये असलेल्या अन्य डॉक्टरांनी त्वरित महिला डॉक्टरला वाचविण्यासाठी धाव घेतली होती. यासंबंधी महिला डॉक्टरने संस्थेचे कुलपती डॉ. आर.व्ही. कुमार यांना पत्र लिहून कळविले आहे. बंगारू राजू नावाच्या रुग्णाने या महिला डॉक्टरवर हल्ला केला होता. घटनेवेळी वॉर्डमध्ये कुठलाच सुरक्षारक्षक नव्हता. ही घटना रुग्णालयातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. रुग्णाकडे एखादे धारदार अस्त्र असते तर स्थिती बिघडली असती असे या महिला डॉक्टरने स्वत:च्या तक्रारीत नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article