For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्षाबंधनासाठी माहेरी निघालेल्या महिलेचा कल्लेहोळ क्रॉसवरील अपघातानंतर मृत्यू

06:24 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
रक्षाबंधनासाठी माहेरी निघालेल्या महिलेचा कल्लेहोळ क्रॉसवरील अपघातानंतर मृत्यू
Advertisement

भाऊही जखमी, काकती पोलिसात अपघाताची नोंद

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

रक्षाबंधनासाठी आपल्या भावाबरोबर माहेरी निघालेल्या बेळवट्टी, ता. बेळगाव येथील एका महिलेचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी कल्लेहोळ क्रॉसजवळ ही घटना घडली असून या अपघातात भाऊही किरकोळ जखमी झाला आहे.

Advertisement

रेखा महेश हरगुडे (वय 38) राहणार बेळवट्टी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. महेश भरमा कलखांबकर (वय 44) राहणार सुळगा-हिंडलगा असे जखमी भावाचे नाव असून काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करीत आहेत.

सुळगा येथील महेश कलखांबकर हा युवक आपल्या मोटारसायकलवरून बहिणीला घेऊन बेळवट्टीहून बेळगुंदी रोडवरून सुळग्याकडे निघाला होता. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कल्लेहोळ क्रॉसजवळ मोटारसायकलवरून पडून हे भाऊ-बहीण जखमी झाले. सुरुवातीला खासगी इस्पितळात उपचार करून रेखा यांना हुबळी येथील किम्स इस्पितळात हलविण्यात आले.

अपघातात डोक्याला दुखापत झाल्यामुळे किम्समध्ये उपचार सुरू होते. उपचाराचा उपयोग न होता शनिवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. रक्षाबंधनासाठी माहेरी निघालेल्या महिलेच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.