महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीच्या कालकाजी मंदिरात स्टेज कोसळून महिलेचा मृत्यू

06:36 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

17 जखमी; गायक बी प्राक यांचे भजन ऐकण्यासाठी गर्दी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजधानी दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिरात जागरण सुरू असताना रात्री उशिरा कीर्तनासाठी तयार करण्यात आलेली स्टेज कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू होण्याबरोबरच 17 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर मंदिरात चेंगराचेंगरी झाली. जखमींना दिल्लीतील वेगवेगळ्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात जागरण व कीर्तन सुरू असताना स्टेज कोसळण्याची दुर्घटना घडली. गायक बी प्राक यांचे भजन ऐकण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्टेज अचानक कोसळताच मंदिरात चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना दिल्लीतील एम्स, सफदरजंग आणि मॅक्स ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article