शेर्ले येथे दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने महिलेचा मृत्यू
03:27 PM Jul 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
शेर्ले येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली.ही घटना बुधवारी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास घडली .सदर गंभीर जखमी महिलेवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन तिला अधिक उपचासाठी गोवा बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा वाटेतच त्यांचे निधन झाले.लक्ष्मी नारायण माळकर वय ( ६० ) रा. पाडलोस असे नाव आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ .गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार केले. परंतु , त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले.
Advertisement
Advertisement