महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

10:28 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप

Advertisement

बेळगाव : प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत डॉक्टरांना जबाबदार धरले. सदर महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. पण प्रसूती दरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कल्पना अनिल लमानी (वय 29) असे त्या महिलेचे नाव आहे. ती सौंदत्ती तालुक्यातील हलकी तांडा येथील रहिवासी आहे. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी प्रसूती वॉर्डच्या बाहेर जमून डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. प्रसूतीनंतर दुपारी कल्पनाची तब्येत चांगली होती. मात्र, सायंकाळी अचानक तिचा मृत्यू झाला आहे. रक्तदाब कमी झाल्याने कल्पनाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसूतीनंतर डॉक्टरांनी तिच्यावर योग्य उपचार केले नाहीत. डॉक्टरांचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होत एफआयआर नोंद केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article