For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्याने महिलेचा मृत्यू: यवलुजमधील घटना

04:19 PM Jul 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्याने महिलेचा मृत्यू  यवलुजमधील घटना
Kolhapur News Yavluj
Advertisement

पन्हाळा-प्रतिनिधी

शेताकडे कामावर जात असताना मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्याने यवलूज ता . पन्हाळा येथील वत्सला बाळू जाधव (वय ६५ ) या महिलेचा मृत्यू झाला.साताप्पा मारुती देशमुख (वय २४ ) (मूळ गांव व्हन्नूर, ता. कागल ) सध्या राहणार यवलूज हा तरुण स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एमएच ०९ इ वाय.७१५३ वरून निटवडे फाट्या - वरणगे रस्त्यावर जाताना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकी झाली आहे.

Advertisement

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मयत वत्सला जाधव या आपल्या शेतावर निघाल्या होत्या.पाठीमागून वेगाने आलेल्या साताप्पा देशमुख याने मोटरसायकलने जाधव यांना जोरदार धडक दिली.जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकी झाली आहे. तरी लवकरच पन्हाळा पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात येऊन देशमुख याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होईल असे पणा पोलिसांनी सांगितले. तरी गरीब कुटुंबातील शेतमजूर महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळव्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.