महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राधानगरी येथील अपघातात महिला जागीच ठार! मृत महिला वारणानगर येथील

06:00 PM May 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
Radhanagari accident
Advertisement

राधानगरी/प्रतिनिधी

निपाणी- देवगड राज्यमार्गावर राधानगरी बसस्थानकाशेजारी हॉटेल ओमसाई जवळ मालवाहक ट्रकच्या धडकेत मोटरसायकल वर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वारणानगर व कोल्हापूर येथील काहीजण नातेवाईकांसह पर्यटणासाठी आले होते. काळम्मावाडी धरण पाहून राधानगरी धरण पाहण्यासाठी येत असताना राधानगरी बस स्थानक शेजारी पाणी पिण्यासाठी थांबले होते. त्याच दरम्यान एम. पी .०९.७८०१ या भरधाव ट्रकची धडक बसल्याने मोटर सायकल नंबर एम.एच.०९ एफ.एच ५८८५ वरील मागे बसलेल्या आसमा समीर सय्यद (वय ३०) रा, मूळ गाव ,जाखले.ता, पन्हाळा सध्या रा, वारणानगर या जागीच ठार झाल्या.ही घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली. पती समीर सय्यद हे वारणानगर येथे दूध संघात नोकरीस आहेत.ते किरकोळ जखमी झाले आहेत, त्याना दोन लहान मुले आहेत. घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती, त्यामुळे या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती, घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाले व महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.

Advertisement

राधानगरी पेट्रोल पंपा पासून राधानगरी धरण स्थळा पर्यंत नवीन काँक्रीट रस्ता झाला आहे. गेल्या दोन महिन्यात या रस्त्यावर दोन अपघात झाले असून दोघांनाही जीव गमवावा लागला आहे, गेल्या काही महिन्यापासून गगनबावडा घाटातून वाहतूक बंद असल्याने तळकोकणकडे जाणारी अवजड वाहतूक सद्या राधानगरी दाजीपूर मार्गे सुरू आहेत, तसेच नवीन रस्ता झाल्याने काही वाहनधारक वेगाने वाहने चालवत असल्याने या राज्यमार्गवर गतिरोधक तयार करावेत आणि कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक पोलीस नेमावेत अशी स्थानिकातून मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
Radhanagariwarnanagar
Next Article