For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलेला झाला दुर्लभ आजार

06:36 AM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिलेला झाला दुर्लभ आजार
Advertisement

खाऊ शकते केवळ दोन पदार्थ

Advertisement

लोक खाण्यापिण्याचे इतके छंदिष्ट असतात की, यामुळे अनेकदा खाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. परंतु ज्या लोकांना खाण्याची आवड आहे, परंतु सर्वकाही सोडून देण्यास भाग पडल्यास किती वाईट वाटेल याचा विचार करा. असेच एका महिलेसोबत घडले असून ती केवळ 2 पदार्थ खाऊ शकते. जर चुकून तिने या दोन पदार्थांच्या व्यतिरिक्त अन्य काही खाल्ले तर तिचा जीवच धोक्यात येऊ शकतो.

फळे, भाज्या, डाळी, भाकरी तसेच अन्य मनपसंत खाद्यपदार्थ खाण्याची तिला अनुमती नाही. या महिलेचे नाव कॅरोलिन क्रे असून ती एका दुर्लभ आजाराने पीडित आहे. कॅरोलिनला बालपणापासूनच काही अॅलर्जीची समस्या होती. वयाच्या केवळ दुसऱ्या वर्षी तिला नट्सपासून (मेवा) अॅलर्जी होती. याचबरोबर कीवी, तिळ आणि मोहरींपासूनही तिला समसया होती, या गोष्टी सोडून ती सर्वकाही आरामात खाऊ शकत होती आणि सामान्य जीवन जगत होती.

Advertisement

कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात बदलले आयुष्य

2017 मध्ये कॅरोलिन 18 वर्षांची होती आणि तिच्या कॉलेज आयुष्याची सुरुवात झाली होती. तेव्हा तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मित्रांसोबत कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात तिने चॉकलेट-चिप आइस्क्रीम खाल्ले, काही मिनिटातच तिची प्रकृती बिघडू लागली आणि तिला तीव्र अॅलर्जिक रिअॅक्शन म्हणजेच एनाफिलॅक्सिस झाले. या घटनेनंतर कॅरोलिनला अनेक आठवड्यांपर्यंत रुग्णालयात रहावे लागले. डॉक्टरांनी अनेक परीक्षणं केल्यावर ओट्स, अंडी, बेकन आणि पाणी तिच्यासाठी सुरक्षित असल्याचे आढळून आले. कॅरोलिन यानंतर युनिव्हर्सिटीत पोहोचली असता स्थिती आणखी बिघडली.

केवळ 2 खाद्यपदार्थ

डॉक्टरांनी कॅरोलिनाला मास्ट सेल एक्टिवेशन सिंड्रोम (एमसीएएस) नावाचा दुर्लभ आजार असल्याचे सांगितले. या आजारात शरीराच्या इम्यून पेशी विनाकारण अधिक रसायनांना सोडतात, यामुळे अॅलर्जीसारखी लक्षणे, पोटाच्या समस्या, श्वसनावेळी त्रास, थकवा, ब्रेन फीग आणि कधीकधी जीवघेणे एनाफिलॅक्सिस होऊ शकते. दुर्दैवाची बाब म्हणजे या आजारावर अद्याप कुठलाच स्थायी उपचार नाही. उपचार सुरू झाल्यावर कॅरोलिनची प्रकृती काहीशी बरी झाली. औषधांच्या मदतीने ती काहीसे खाऊ लागली आणि रेस्टॉरंटपर्यंत जाऊ शकली. कॅरेबियन येथे गेल्यावर तिने सॅलडचे दोन खास खाल्यावर पुन्हा तिची प्रकृती बिघडली आणि तिला एअरलिफ्ट करून घरी परत आणले गेले.  आजारामुळे कॅरोलिनचे वजन अत्यंत कमी झाले. 5 फूट 8 इंच लांबीत तिचे वजन केवळ 105 पाउंड राहिल आहे. अखेर डॉक्टरांनी तिला हायपोअॅलर्जिक बेबी फॉर्म्यूला पिण्याचा सल्ला दिला. हे अमीनो अॅसिडने निर्माण झालेले असते, ज्यामुळे अॅलर्जीचा धोका होत नाही. हाच फॉर्म्युला आता तिच्या जीवनाचा आसरा ठरला आहे. सुमारे 7 वर्षांनीही कॅरोलिन केवळ पाणी आणि ओट्स आणि हा फॉर्म्युलाच खाऊ शकते. ती सोशल मीडियावर स्वत:ची कहाणी शेअर करत एमसीएएसविषयी जागरुकता निर्माण करत आहे.

Advertisement
Tags :

.