गळफास घेत महिलेची आत्महत्या
04:49 PM Mar 03, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
रत्नागिरी
Advertisement
शहरातील बोर्डींग रोड येथे गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आल़ी निकिता गौतम तुपेरे (४०, ऱा बोर्डिंग रोड रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े
निकिता हिने २ मार्च रोजी आपल्या राहत्या घरी कुणीही नसताना ऊममधील लाकडी बाराला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल़ी या प्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल़ा निकिता हिने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आलेले नाह़ी या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement