For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक

06:48 PM Feb 01, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक
Advertisement

                  वर्षभर महिलेवर फसवणूक करणाऱ्या संशयितावर पोलीस कारवाई

Advertisement

सांगली : लग्राचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंधठेवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित विशाल ब-साप्पा आठवले (रा. दत्त मंदिर समोर, दत्त कॉलनी, सुभाषनगर, मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विशाल आठवले हा वर्षभरापासून पीडित महिलेच्या संपर्कात आहे. त्याने जानेवारी २०२५ च्या दरम्यान तिच्याशी अधिक जवळीक साधली. तिला लग्राचे आमिष दाखवले. त्यानंतर वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. प्रत्येक वेळी तो पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्र करणार असल्याचे सांगत होता.

Advertisement

त्याने वर्षभरात पिडीतेच्या राहते घरी, म्हैसाळ विश्रामबाग परिसरात, संजयनगर परिसरात भाड्याच्या घरात तसेच काहीवेळा वेगवेगळ्या लॉजवर पीडीतेशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत. पीडित महिलेने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. मारहाण केली. त्याचबरोबर फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली असल्याचे महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित विशाल आठवले याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

Advertisement
Tags :

.