For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एमटीएस’ पदासाठी महिलेला गंडविले

12:43 PM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एमटीएस’ पदासाठी महिलेला गंडविले
Advertisement

वास्कोतील प्रकार, 4 लाख 30 हजाराचा गंडा : बायणातील गोविंद मांजरेकर गजाआड,सूरज नाईक बेपत्ता होण्यात यशस्वी,नोकरी घोटाळा प्रकरण वाढता वाढेच

Advertisement

वास्को : शिक्षण खात्यात मल्टि टास्क स्टाफ (एमटीएस) पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला जवळपास साडेचार लाख रूपयांचा गंडा घालण्याचा प्रकार वास्कोत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोविंद मांजरेकर याला अटक केली आहे. त्याचा सहकारी सूरज नाईक हा बेपत्ता आहे. नवेवाडे वास्कोतील साक्षी सुदर्शन केरकर या महिलेने या दोघांविरूध्द फसवणुकीची तव्र्रार नोंद केली आहे. फसवणूक झालेल्या महिलेने वास्को पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गोविंद व सूरज या दोघांनी तिला शिक्षण खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्या दोघांना 4 लाख 30 हजार रूपये दिले होती. हा व्यवहार साधारण दीड वर्षांपूर्वी झाला होता. गोविंद व सूरज हे दोघेही बायणा वास्कोतील असल्याने तिने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र, नोकरीसाठी लाखो रूपये देऊनही नोकरी मिळत नसल्याने तिला संशय आला. त्यामुळे तिने त्यांच्याकडे आपले 4 लाख 30 हजार रूपये परत देण्याची मागणी केली. पैशांसाठी तगादा लावूनही पैसे परत मिळत नसल्याने शेवटी तिने वास्को पोलिसस्थानकात त्या दोघांविरूध्द तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना गोविंद मांजरेकर याला अटक केली, तर सूरज नाईक हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ठकसेन पूजा नाईकची म्हार्दोळ कोठडी वापसी

Advertisement

ठकसेन पूजा नाईक हिच्या जॉब स्कॅमचा पहिला बळी ठरलेला श्रीधर कांता सतरकर याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी सदर घटना आत्महत्या म्हणून घोषित करून त्यावर पांघरूण घातले. त्यानंतर मयत श्रीधरच्या पत्नीने केलेल्या तक्रारीत श्रीधर याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा नाईक हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सद्या ठकसेन पूजा नाईकची म्हार्दोळ पोलिस कोठडीत पुन्हा ‘कोठडीवापसी’ झालेली आहे.बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या पूजा नाईक हिच्यांशी पैशाच्या देवाणघेवाणप्रकरणी संशयित म्हणून सरकारी कर्मचारी श्रीधर कांता सतरकर (51, नाळ्ळे केरी) याला म्हार्दोळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर श्रीधरचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत कुंकळये म्हार्दोळ येथे आढळला होता. जॉब स्कॅम प्रकरणातील तो पहिला बळी ठरला होता. श्रीधर सतरकरच्या आत्महत्येप्रकरणी म्हर्दोळ पोलिसांनी पूजा नाईक हिच्या विऊद्ध गुन्हा नोंदवून सोपस्कर पूर्ण केले. यापूर्वी पूजा नाईक हिला डिचोली व पर्वरी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी म्हर्दोळ पोलिसांनी तिला अटक करून रविवारी प्रथम वर्ग न्यायालयात हजर केल्यानंतर तिला 3 दिवसाच्या रिमांडवर पुन्हा कोठडी वापसी केली आहे.

Advertisement
Tags :

.