नकली बाळ स्वत:सोबत बाळगणारी महिला
कारण जाणून घेतल्यावर लोक होतात थक्क
लहान मुले प्रत्येकालाच आवडतात. ममतेचे सुख मिळावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. अशाच एक महिलेला दोन मुले आहेत, परंतु यातील एक नवजात खरा नसल्याचा खुलासा तिने केला आहे. मुले एकाची दोन कशी झाली याची कहाणी देखील सामान्य नाही. प्रत्यक्षात आई होण्यापूर्वी मॅडी या महिलेने डॉलला स्वत:चे मूल मानले होते. तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती, तेव्हा तिला पहिले मूल झाले नव्हते. चिमुकल्या ओफेलियाने तिच्या जीवनात आनंद आणला होता. परंतु लवकरच ती 18 वर्षांची झाली आणि मॅडी नवजात बाळाची कमतरता दिला जाणवू लागली.
अनोखा उपाय
मॅडीने स्वत:च्या समस्येवर अनोखा उपाय काढला, ती एका चिमुकल्या डॉलची देखभाल ओफेलियासोबत करते. ती स्व:ला या रीबॉर्न डॉलची रीबॉर्न मॉम म्हणवून घेते. डॉलचे नाव फॉरेस्ट आहे. मॅडी फॉरेस्टला जिवंत बाळाप्रमाणे स्वत:सोबत राखते, तिचे वेगळे कपडे, चेजिंग एरिया आणि बाटली देखील आहे.फॉरेस्ट जेव्हा पोस्टद्वारे घरी पोहोचली तेव्हा तिच्यासोबत तिचे जन्म प्रमाणपक्ष, जन्मतारीख, जन्मावेळचे वजन सर्व माहिती आली आणि तिच्या कपड्यांवर ‘आय लव्ह माय मम्मी’ असे लिहिले होते. अशाप्रकारच्या डॉलला रिबॉर्न बेबीज म्हटले जाते. मॅडीला याची माहिती एका टीव्ही डॉक्युमेंट्रीतून मिळाली होती आणि त्यानंतरच तिने त्यांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. रीबॉर्न बेबीची किंमत 33 हजार रुपयांपासून 22 लाख रुपयांपेक्षाही अधिक असू शकते. सोशल मीडियावर मॅडी अत्यंत सक्रीय आहे. टिकटॉक, इन्स्टाग्रामवर लोक मॅडीला पाहून तिला ट्रोल करत असतात. तर डॉल्स माझ्यासाठी खेळणी नसल्याचे मॅडीचे सांगणे आहे.