For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : आटपाडीतील नेलकरंजीत महिलेला मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल

03:15 PM Dec 16, 2025 IST | NEETA POTDAR
sangli crime   आटपाडीतील नेलकरंजीत महिलेला मारहाण   पाच जणांवर गुन्हा दाखल
Advertisement

                  आटपाडी तालुक्यातील गंभीर हिंसाचार

Advertisement

आटपाडी :नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे महिलेला लोखंडी गज, विळा आणि काठीने मारहाणीची घटना घडली. यातील जखमी उज्वला प्रमोद माळी (४७) यांच्या फिर्यादीवरून गावातीलच पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नेलकरंजीतील मारहाण प्रकरणी तानाजी भिकू माळी, अशांत तानाजी माळी, कलावती तानाजी माळी, अक्षय दिलीप माळी आणि दिलीप रंगनाथ माळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला माळी यांच्या फिर्यादीनुसार त्या त्यांच्या वडिलांच्या शेतजमिनीमध्ये जनावरे चारण्यासाठी घेवुन जात होत्या. तेंव्हा तानाजी माळी यांनी माझे रानातुन जनावरे घेवुन जायचे नाही, असे म्हणुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

Advertisement

लोखंडी गजाने गुडघ्यावर, मांडीवर मारहाण केली. अशांत माळीने डाव्या पायाच्या पोठरीवर व डाव्या हातावर मारहाण करुन जखमी केले. कलावती माळी हिने तिच्या हातातील गवत कापण्याच्या विळ्याने उज्वला यांच्या उजवे हाताच्या पंजावर मारहाण केली. अक्षय दिलीप माळी व दिलीप रंगनाथ माळी यांनीही तेथे येवुन उज्वला यांना काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.

Advertisement
Tags :

.