महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साऊंड सिस्टिम विरहित २९ वर्षे साजरा होत आहे 'एक गाव एक गणपती' ! सावर्डे दुमाला गावातील युवकांचा उपक्रम

04:01 PM Sep 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ek Gaon Ek Ganapati Youth activity of Sawarde Dumala village
Advertisement

कसबा बीड / वार्ताहर

सावर्डे दुमाला तालुका करवीर येथे 1995 पासून सलग 29 वर्षे एक गाव एक गणपती गणेशोत्सव सर्व मंडळी एकत्र येऊन अखंडितपणे सुरू आहे. सावर्डे दुमाला गावच्या ‘एक गाव, एक गणपती‘ परंपरेने तालुक्यात आपले वेगळेपण कायम जपले आहे. या गावचा ‘एक गाव, एक गणपती‘ सार्वजनिक उत्सव अत्यंत दिमाखात व सर्वांत अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीमविरहित साजरा होत आहे.

Advertisement

गाव म्हणजे गट तट राजकारण व त्याच्या माध्यमातून साजरे होणारे सण यामध्ये प्रकर्षाने एकत्रता दिसून येत नसल्याचे चित्र सध्या प्रचलित होत आहे पण या सर्वांना फाटा देत गटतट, विविध पक्ष, अनेक संस्थांचे जाळे, गल्लोगल्ली असणारी मंडळे, त्यांच्यातील ईर्षा, नानाविध मतप्रवाह बाजूला ठेवत सर्व घटकांनी एकत्र येत ‘एक गाव, एक गणपती‘ हा उपक्रम सावर्डे दुमाला गावाने सलग 29 व्या वर्षीही ही परंपरा कायम राखली आहे. ती म्हणजे सावर्डे गावातील जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाने 1995 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास कै. कृष्णात मारुती पाटील,मधुकर कारंडे,श्री दत्तात्रय निकम, तानाजी निकम, बाजीराव कारंडे, एकनाथ निकम या फाउंडर युवकांनी या प्रथेची सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला आज अखेर गावातील सर्व तरुण मंडळांचे सहकार्य लाभते आहे.

Advertisement

गणेशोत्सव काळात श्रींची मूर्ती पारंपारिक पद्धतीने आणली जाते. सकाळ संध्याकाळी सार्वजनिकरीत्या गणेश आरती होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.गणेश आगमन अगर विसर्जन मिरवणुकीवेळी साउंड सिस्टीम ला फाटा दिला जातो. मिरवणुकीवेळी भजन, झांज पथक, धनगरी ढोल, लेझीम, मर्दानी खेळ आदी पारंपरिक वाद्यांचा वापर होत असतो. गणेशोत्सवादरम्यान गावातील अनेक मंडळांकडून विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.डॉल्बी नाही धिंगाणा नाही तर पारंपारिक वाद्याचा खेळाचा ढोल ताशांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करणारे करवीर तालुक्यामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केलेले गाव सावर्डे दुमाला असे म्हटले तर वावगे होणार नाही.

करवीर तालुक्यातील कसबा बीड भागामध्ये सावर्डे दुमाला आहे गाव 29 वर्षे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत आहे. हे समजताच या गावास भेट देणे हे आवश्यक आहे . कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो ? हे खास पाहण्यासाठी म्हणून सावर्डे दुमाला गावास भेट दिली आहे. एकीकडे गावामध्ये 15 ते 20 मंडळे स्थापन होऊन गणपती साजरा करत असताना दिसतात तर दुसरीकडे सावर्डे दुमाला गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे हे कौतुकास्पद आहे असे उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग गौरवोद्वर सुजितकुमार क्षिरसागर यांनी केले.

1995 ला एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी यासाठी बैठक घेण्यात आली.त्यावेळी गावातील सर्व तरुण मंडळांनी मान्यता दिली.सिंहासनावर बसलेली मूर्ती पाच फुटापेक्षा उंचीची नसावी असा ठराव करण्यात आला. तेव्हा एक गाव एक गणपती मूर्ती स्थापन करण्याचा पहिली संधी मला मिळाली .संपूर्ण गाव एकत्र येऊन हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो. असे प्रकाश कारंडे,संस्थापक ,
अध्यक्ष जय शिवराय व्यायाम तालीम मंडळ,

 

Advertisement
Tags :
Ek Gaon Ek Ganapati Youth activity of Sawarde Dumala villag
Next Article