For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डांबरीकरणानंतर काही दिवसांतच अनमोड मार्गावर पडले मोठमोठे खड्डे

10:24 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
डांबरीकरणानंतर काही दिवसांतच अनमोड मार्गावर पडले मोठमोठे खड्डे
Advertisement

अधिकाऱ्यांकडून केवळ पोकळ आश्वासनेच, पूर्तता कधी ? नागरिकांचा सवाल

Advertisement

वार्ताहर /रामनगर

रामनगरपासून अनमोड हा मार्ग कित्येक वर्षापासून उन्हाळ्यात धुळीचा सामना तर पावसाळ्यात खड्ड्यांचा सामना हे वाहनधारकांना नवे नाही. परंतु यंदा या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे थोडासा वाहनधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु डांबरीकरण करून काही आठवडेही गेले नाहीत त्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने छोट्या वाहनधारकांना तर मोठी कसरतच करावी लागत आहे. अनेक वेळा सदर खड्ड्यांमध्येच वाहने बंद पडल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. अनेक छोटी मोठी वाहने सदर खड्ड्यात अडकून नादुऊस्ती होताना दिसत आहेत.

Advertisement

...तर रस्ता बंद होण्याची शक्यता

खड्ड्यांमध्ये टाकाऊ माल टाकून तरी खड्डे भरण्याचे अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. पण त्यांच्याकडून केवळ आश्वासने देण्यात आली. त्याची पूर्तता करण्यात येत नसल्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदाराबाबत संशय निर्माण होत आहे. सदर खड्डे लवकरात लवकर न भरल्यास छोट्या वाहनांसाठी हा मार्ग पूर्णता बंद होण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.