For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढीव कर त्वरित मागे घ्या

10:47 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढीव कर त्वरित मागे घ्या
Advertisement

नेसरगी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : नेसरगी (ता. बैलहोंगल) ग्राम पंचायतीकडून नव्या कर प्रणालीनुसार भरमसाट कर आकारणी सुरू केल आहे. यामुळे ग्रामस्थांवर आर्थिक भार वाढला आहे. दुष्काळामुळे नागरिक त्रस्त असताना ग्राम पंचायतींकडून कराची वसुली केली जात आहे. ही कर आकारणी त्वरित थांबविण्यात यावी. संगणक उताऱ्यासाठी गोर-गरीब नागरिकांकडून अधिक रक्कम आकारली जात आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. नेसरगी ग्राम पंचायतीकडून रस्त्याच्या बाजूला लहान, सहान दुकाने घालून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून अधिक कर आकारला जात आहे. यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. दुष्काळामुळे नागरिक त्रस्त असताना वाढ करण्यात आलेले कर अयोग्य आहेत. त्वरित कर आकारणी थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

मालमत्ता बळकावलेल्यांची चौकशी करा

Advertisement

गावामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुडुंब भरल्या आहेत. गावात दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्राम पंचायतींकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात. मात्र त्यानुसार सुविधा दिल्या जात नाहीत, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. ग्राम पंचायतीच्या मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे. अनेक जणांनी अतिक्रमण करून मालमत्ता बळकावल्या आहेत. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement
Tags :

.