महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

समिती कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

10:46 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोल्हापूर जिल्हा पोलीसप्रमुखांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 4 रोजी शिनोळी येथे रास्तारोको करण्यात आला. रास्तारोको केल्याबद्दल चंदगड पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत रास्तारोको करून बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्ग तीन तासांसाठी अडविण्यात आला. त्यामुळे सोमवारी सायंकाळी चंदगड पोलिसांनी शिवसेनेच्या नेत्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी बुधवारी सायंकाळी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरचे जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेतली. त्यांनी आंदोलनामध्ये काय काय घडले याची माहिती घेतल्यानंतर आपण गुन्हे मागे घेऊ, असे आश्वासन दिले. माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पोलीस प्रमुखांना भेटले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article