महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

10:37 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मादिग समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : हुबळी-धारवाड येथे मागील आठवड्यात अंजली अंबिगेर हिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी साहाय्यक पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) राजीव एम. यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाई पूर्णपणे चुकीची असून निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी मादिग समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत असताना मागील आठवड्यात हुबळी-धारवाड येथील अंजली अंबिगेर नावाच्या युवतीचा खून झाला. या प्रकरणात पोलिसांनी कसूर केल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त राजीव एम. यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु, एका दलित अधिकाऱ्याला या प्रकरणात गोवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह इतर मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी बसवराज मादर, यल्लाप्पा हुदली, गोपी बळ्ळारी, कुमार, रवी, प्रभाकर, नागेश यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article