For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेजीसोबत शेअरबाजार नव्या विक्रमाकडे झेपावला

06:58 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तेजीसोबत शेअरबाजार नव्या विक्रमाकडे झेपावला
Advertisement

दोन्ही निर्देशांकांची गाठली नवी विक्रमी पातळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक बाजारामध्ये असणाऱ्या तेजीमुळे भारतीय शेअरबाजारसुद्धा सोमवारी नव्या विक्रमाला गवसणी घालत बंद झाला होता. सेन्सेक्स 494 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला. ऑटो आणि रियल्टी निर्देशांकांनी सोमवारी दमदार तेजी अनुभवली होती.

Advertisement

सरतेशेवटी 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 494 अंकांच्या वाढीसह 74742 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 152 अंकांनी वाढत 22666 अंकांवर बंद झाला.  दिवसभराच्या सत्रामध्ये सेन्सेक्स निर्देशांकाने 74869ची नवी सर्वकालीक उच्चांकी पातळी गाठली होती. यासोबत निफ्टीनेदेखील 22697चा नवा विक्रमी स्तर गाठला होता. बीएसईवरील सर्व सुचीबद्ध समभागांचे एकत्रित भांडवलमूल्य 1.3 लाख कोटी रुपये इतके वाढून ते 400 लाख कोटीच्यावर पहिल्यांदाच पोहोचले होते.

ऑटो आणि धातूनिर्देशांक विक्रमी तेजी दर्शवू शकले होते. जेएसडब्ल्यू स्टील, श्रीराम फायनान्स, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा, आयशर मोटर्स, एनटीपीसी यांचे समभाग सर्वाधिक वाढले होते. घसरणीतील समभागांचा विचार करता नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल, विप्रो, एलटीआय माईंड ट्री, सनफार्मा आणि एचसीएल टेक यांचा समावेश होता.

एसबीआय  लाईफ, ग्रासिम इंडस्ट्री यांचे समभाग तेजीसह बंद झाले. अदानी पोर्टस्चे समभाग घसरणीत होते. निफ्टी ऑटो निर्देशांक 2 टक्के वाढीसोबत कार्यरत होता. मिडकॅप 100 निर्देशांक काहीशा तेजीसोबत व्यवहार करत होता. निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले.  अमेरिकेमध्ये मार्च महिन्यात 3लाखहून अधिक नोकऱ्या देण्यात आल्याने शुक्रवारी नॅसडॅक आणि एस अँड पी 500 निर्देशांक 1 टक्क्यांपेक्षा अधिक तेजीसमवेत बंद झाले होते. याचा प्रभाव सोमवारी भारतीय बाजारावर दिसला.

Advertisement
Tags :

.