महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाईजानच्या आगमनाने इफ्फीत आली ‘जान’!

12:08 PM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाचीचा चित्रपट ’फर्रे’ चा प्रिमियर : रेड कार्पेटवर दाखल, चाहत्यांचा जल्लोष

Advertisement

पणजी : ‘फर्रे’ या चित्रपटाच्या प्रिमियरनिमित्त गोव्यात आलेले प्रसिद्ध अभिनेते ’भाईजान’ सलमान खान हे मंगळवारी इफ्फीतील प्रमुख आकर्षण ठरले. इफ्फीच्या रेड कार्पेटवर त्यांनी एन्ट्री घेताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे आयनॉक्सचा परिसर अक्षरश: दुमदुमून गेला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सलमानने रेड कार्पेटवर ग्रॅन्ड एन्ट्री घेतली. इफ्फीत प्रदर्शित करण्यात येणारा ’फर्रे’ हा चित्रपट सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री हिने निर्माण केला आहे. तो तिचा पहिलाच चित्रपट असून मुख्य भूमिकाही तिचीच आहे. सौमेंद्र पाधी या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिषेक यादव यांनी लेखन केले आहे. इंडियन पॅनोरमामध्ये निवड करण्यात आलेल्या 25 फिचर आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील फसवणूक आणि गुंतागुंत या अनोख्या विषयावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे थोडक्यात कथानक म्हणजे, ‘नियती नावाच्या अनाथ विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती मिळाली आहे मात्र, तिच्याच श्रीमंत मित्रांमुळे ती एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये अडकते. भाचीचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे तिचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सलमान इफ्फीत दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article