For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गट वाढल्याने राजकारणात खानापूरचा दबदबा

05:54 PM Jul 18, 2025 IST | Radhika Patil
गट वाढल्याने राजकारणात खानापूरचा दबदबा
Advertisement

 विटा / सचिन भादुले :

Advertisement

पुनर्रचनेत खानापूर तालुक्यात पुन्हा जिल्हा परिषदेने चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण अस्तित्वात आले. गतवर्षीच्या तीन गट आणि सहा गणांचे समीकरण पुन्हा बदलले असून यावेळी बलवडी (खा.) हा पंचायत समितीचा नवीन गट अस्तित्वात आला आहे. खानापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर खानापूर घाटमाथ्यावर पुन्हा एकदा जिल्हा परिषद गट झाल्याने तालुक्याचा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा दबदबा वाढणार आहे.

खानापूर नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यामुळे तालुक्यात गेल्या जिल्हा परिषद निवडणूकीवेळी एक जिल्हा परिषद गट कमी झाला आणि पंचायत समितीचे दोन गण कमी झाले.

Advertisement

खानापूर जिल्हा परिषद गट कमी झाला. त्याचवेळी खानापूर आणि पारे हे पंचायत समिती गण कमी झाले. त्यामुळे लेंगरे, नागेवाडी आणि भाळवणी असे तीन जिल्हा परिषद गट आणि लेंगरे, करंजे, नागेवाडी, गार्टी, भाळवणी आणि आळसंद असे सहा पंचायत समिती गण होते. त्यावेळी तत्कालीन आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली बाबर गटाने सहा पैकी पाच पंचायत समिती गण आणि तीनही जिल्हा परिषद गटात विजय मिळवला होता.

  • गतवेळी बाबर गट जिल्ल्याच्या केंद्रस्थानी

गतवेळी जिल्हयाच्या राजकारणात सतेचा लोलक आमदार बाबर गटाच्या हाती आला. बाबर गटाने तत्कालीन काळात भाजपला साथ देत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सुहास बाबर यांच्यारूपाने मिळवले.

जिल्हा परिषदेच्या राजकारणावर बाबर गटाचा दबदबा पहायला मिळाला. तर पंचायत समितीतही बाबर गटाची एकहाती सता आली होती. शिवसेनेला मिळणारे अध्यक्षपद सोडून युतीशी प्रामाणिक राहिल्याने आमदार बाबर यांचे मुंबईच्या राजकारणातही वजन वाढले. परिणामी आमदार बाबर गटाचा जिल्ह्यात दबदबा राहिला.

  • जिल्हा परिषदेत दबदबा वाढणार

गतवेळी केवळ तीन जिल्हा परिषद सदस्य असतानाही भाजप आणि महाविकास आघाडीच्या मध्ये शिवसेना निर्णायक भूमिकेत होती, यावेळी तर खानापूर तालुक्यात चार जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत.

तर आटपाडीतही चार जिल्हा परिषद गट आहेत. यातील अधिकाधीक जागा निवडून आणून जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावण्याची संधी पुन्हा एकदा बाबर गटाला आहे. खानापूरच्या ग्रामीण भागातील बाबर गटाचा दबदबा आणि आटपाडीतील बदललेली समिकरणे पाहता बाबर गट निर्णायक झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. अर्थातच त्यासाठी जिल्हाभरात महाविकास आघाडी आणि भाजपमधील सामना रंगला पाहिजे, हे मात्र नक्की.

यावेळी पुनर्रचनेत पुन्हा चार जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत. नागेवाडी, लेंगरे, करंजे आणि भाळवणी असे जिल्हा परिषद गट आणि नागेवाडी, गार्डी, बलवडी (भा.), करंजे, लेंगरे, पारे, भाळवणी आणि आळसंद असे आठ पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत.

त्याचवेळी तालुक्यातील राजकीय समिकरणे देखिल बदलली आहेत. तालुक्यातील प्रमुख विरोधी गट असणाऱ्या पाटील गटाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. तर सत्ताधारी आमदार सुहास बाबर गट शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून सत्तेत आहेतच. त्यामुळे खानापूर तालुक्यात सध्या सर्वच सत्ताधारी आहेत.

  • महायुतीतच रंगणार सामना

ग्रामीण भागात बाबर सेनेचा चांगला प्रभाव आहे. त्यातन गेल्या दहा वर्षांपासून पाटील गट सत्तेपासून वंचित आहे. (यामुळे वाढलेल्या जिल्हा परिषद गटाचा लाभ बाबर गटाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र यावेळी विरोधात पाटील आणि पडळकर गटाची युती होऊन भाजप एकसंघ लढण्याची शक्यता अधिक आहे. पडळकरांनी खानापूर तालुक्यात चांगली मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कितपत यश येते?, हे आगामी निवडणूकीत समजणार आहे. मात्र एकसंघ भाजप आणि बाबर गटाची टक्कर होणार है नक्की. त्यामुळे खानापूर तालुक्यातील सामना हा महायुतीतच रंगण्याची चिन्हे आहेत.

  • नवीन गट आणि गणांची रचना अशी

नागेवाडी जिल्हा परिषद गट नागनाथनगर अर्थात नागेवाडी पंचायत समिती गण वलखड, माहुली, चिखलहोळ, नागनाथनगर, हिंगणगादे आणि घानवड.

गार्डी पंचायत समिती गण भिकवडी (बु), वेजेगांव, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, भाग्यनगर, साळशिंगे, देवनगर आणि गार्डी.

लेंगरे जिल्हा परिषद गट जॉधळखिंडी, मादळमुठी, भूड लेंगरे

पंचायत समिती गण वाळुज, देविखिंडी, सांगोले, आणि लेंगरे पारे पंचायत समिती गण आणि रेवणगांव

वासुंबे, भांबर्डे, रेणावी, पारे, कुर्ली, घाडगेवाडी, घोटी (बु.) करंजे जिल्हा परिषद गट बलवडी (खा.) पंचायत समिती गण शिवशिवापूर (मेंगाणवाडी), बलवडी (खा.), जाधववाडी, गोरेवाडी, अगस्तीनगर (ऐनवाडी), जखिनवाडी, पोसेवाडी, वेणापूर, सुलतानगादे, घोटी खुर्द आणि रेवणगांव खुर्द (भोंडगेवाडी).

करंजे पंचायत समिती गण बाणूरगड, ताडानीवाडी, पळशी, कुसबावडे, हिवरे, करंजे, मोडी, धोंडेवाडी, रामनगर, शेंडगेवाडी आणि भडकेवाडी.

भाळवणी जिल्हा परिषद गट आळसंद पंचायत समिती गण निंनणी (मं.), कार्ये, खंबाळे (भा.) आणि वाार आळसंद, मंगरूळ, बामणी, भाळवणी पंचायत समिती गण ढवळेश्वर, कळंबी, भाळवणी, कमळापूर, बलवडी (भा.). जाधवनगर पंचलिंगनगर आणि तांदळगांव.

Advertisement
Tags :

.