तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी विक्रमी मताधिक्याने जिंकणार
रत्नागिरी :
२००४ पासून तुमच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकत आहे. यावेळीही आम्हाला आत्मविश्वास आहे, परंतु यावेळी सव्वा लाखाच्या वर मताधिक्यानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जिंकायचे आहे आणि ती विक्रमी इच्छा आपण सगळ्यांनी पूर्ण करावी, ही विनंती करायला आपण आलो असल्याचे महायुतीचे उमेदवार तथा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. भविष्यातले चार दिवस अतिशय डोळ्यात तेल घालून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
मी केलेली कामे आणि असलेल्या संपर्क, याच्या जोरावर आज प्रत्येक जिल्हा परिषद गट हा ७५ ते ८० टक्के महायुतीच्या ताब्यात आला आहे. तुमच्यासाठी असलेला माझा संपर्क हाच तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. रात्र होऊनही मोठ्या संख्येने महिला भगिनी येथे जमतात, त्याच्यामुळे आमच्या महायुतीवर असलेला विश्वास हा महिला भगिनींचा किती आहे, हे देखील पहायला मिळत असल्याचे सामंत म्हणाले. माझ्या मतदारसंघातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, यावर्षी या मतदारसंघांमध्ये १९,५५० कोटीचा ३०,००० मुला-मुलींना रोजगार देणारा प्रकल्प आणण्यात यश आले. त्यामुळे मतदार संघातील माझा मुलगा किंवा मुलगी आता मुंबई-पुण्याला जाणार नाही तर त्यांना रत्नागिरीमध्येच नोकरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.