कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पक्षासोबतच 34 माजी नगरसेवकांचा निर्धार काँग्रेस आघाडी भक्कमच

12:27 PM May 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तब्बल 27 नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीविरोधात बंडाचे निशान फडकवले होते. यानंतर दहा नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीला मावळत्या आणि जुन्या अशा तब्बल 34 नगरसेवकांनी हजेरी लावली. कोणत्याही स्थितीत पक्ष सोडणार नाही, काँग्रेससोबतच राहून एकदिलाने काम करुन पुन्हा एकदा महापालिकेवर काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापण्याचा निर्णय या बैठकीत घेतला.

Advertisement

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा दारुण पराभाव झाला. या निवडणुकीनंतर काँग्रेस बॅकफुटवर गेल्यानंतर जिह्यातील राजकारण 360 अंशात फिरले. माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दहा नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जिल्हा नेतृत्वही अलर्ट झाले. मात्र नाराज असलेल्यांसोबत कोणतीही चर्चा करणार नाही. आतापर्यंत पक्षांने आणि आपण स्वत: त्यांच्यासाठी खूप केले आहे, आता पक्षासाठी करण्याची वेळ त्यांची आहे. सत्ता नाही म्हणून कोणी सोडून जात असतील तर खुशाल जावे, अशी आक्रमक भूमीका काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी घेतली. यामुळे नाराजांचे बंड थंड होण्यास मदत झाली. दरम्यान, काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवकांशी संपर्क केला. पक्षासोबत राहण्याची इच्छा असल्यांनी रविवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित रहावे असा निरोप दिला.

या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी तब्बल 34 आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. मावळत्या सभागृहात काँग्रेसचे 29 नगरसेवक होते. तर दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता. पोट निवडणुकीत अजून एक जागा वाढल्याने संख्याबळ 33 झाले होते. 2020 पासून महापालिकेची निवडणूक झालेली नाही. दरम्यान राज्यात तीन वेळा सत्तांतर झाले. 2019 ला चार विधानसभेला एक शिक्षक मतदार संघात आणि एक विधानपरिषद असे बलाबल होते. जिह्यातून घवघवीत यश मिळवणारे काँग्रेस 2024 ला विधानसभा निवडणुकीत शुन्यावर गेली. जिल्हात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसह अजित पवार राष्ट्रवादी गटाची चलती सुरू झाली असतानाच काँग्रेसचा मोठा गट फुटून शिंदे गटात जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र या चर्चेवर आता पडदा पडला असून काँग्रेसही अॅक्शन मोडवर आली आहे. नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधत आघाडी भक्कम असल्याचे संकेत बैठकीतून दिले.

आम्ही सर्वजण आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानून राजकारण आणि समाजकारण करत आहोत. यापुढेही आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहू. येत्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी म्हणून एकदिलाने काम करु असा निर्धार उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला.

या बैठकीला माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख अनुपस्थित होते. तर माजी महापौर निलोफर आजरेकर आणि माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिलीप पोवार बैठकीला पाठ फिरवली. आजरेकर हे अपक्ष निवडून आले होते. त्यांनी निकालानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला होता. याशिवाय बैठकीसाठी 34 आजी माजी नगरसेवक उपस्थित होते अशी माहिती शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article