शहरातील उड्डाण पुलांवर मांजा निर्बंधासाठी बांधणार तारा
महापालिकेच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत निर्णय
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर पतंगाचा मांजा दोऱ्यामुळे वारंवार दुर्घटना घडत आहेत. गांधीनगर उ•ाण पुलावर एका तरुणाचा बळी गेला असून कपिलेश्वर उड्डाण पुलावर आतापर्यंत चौघे जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कपिलेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलासह पीबी रोडवरील गांधीनगर उ•ाणपुलावर काही उंचीवर तारा बांधण्यात याव्यात जेणेकरून मांजा दोरा खाली येणार नाही. अशी सूचना महापालिकेच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली.
मंगळवार दि. 27 रोजी बांधकाम स्थायी समितीची बैठक श्रेयस नाकाडी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर यांच्यासह सदस्य गिरीश धोंगडी इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. सुरुवातीला शाहूनगर विनायक कॉलनी येथील उद्यानाचा विषय चर्चेला आला. वसुंधरा फाऊंडेशनकडून सीएसआर निधीतून उद्यानाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव आला आहे. सदर फाऊंडेशनकडून दोन वर्षे उद्यानाची देखभाल केली जाणार आहे. अटी, शर्थीवर उद्यानाचे सुशोभिकरण करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.
अध्यक्ष व उपस्थित महापौर, उपमहापौर, सदस्यांनी प्रस्तावावर सविस्तर चर्चा केल्यानंतर त्याला मंजुरी दिली. वॉर्ड बजेटमधून शहरातील 58 प्रभागांचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे किती नगरसेवकांनी विकासकामांची यादी दिली आहे? अशी विचारणा करण्यात आली. यावेळी उत्तरमधून 18, मध्य विभागातून 20, दक्षिणमधून 19 तर सहा नगरसेवकांनी देणे बाकी आहे, असे यावेळी सांगण्यात आले. नगरसेवक श्रीशैल कांबळे व सातगौडा यांनी कमानी उभारण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण रस्त्यावर कमान उभारता येणार नाही. उद्यान किंवा तलावाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर कमान उभारण्यास कोणतीही अडचण नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शहरात आवश्यक ठिकाणी गल्लीबोळाच्या कोपऱ्यावर नामफलक बसविण्यात यावेत, अशी महत्त्वाची मागणी नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी केली. बैठकीला हजेरी लावलेल्या नगरसेवक राजू भातकांडे यांनी मांजा दोऱ्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची सूचना मांडली. अलिकडेच पीबी रोडवरील गांधीनगर उ•ाणपुलावर मांजा दोऱ्यामुळे गळा चिरल्याने तरुणाचा बळी गेला आहे. इतकेच नव्हे तर कपिलेश्वर उ•ाण पुलावर एकाच दिवसी तिघेजण जखमी झाले. त्या पाठोपाठ सोमवारी एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला आहे. मांजा दोऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून भविष्यात अशाप्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सर्व ठिकाणच्या उ•ाण पुलांवर काही अंतरावर तारा बांधणे काळाची गरज आहे. उ•ाण पुलावर असलेल्या दिव्यांच्या खांबांना तारा बांधल्यास आलेला दोरा त्यावर अडकेल व तो खाली येणार नाही अशी सूचना मांडली. सदर बाब गांभीर्याने घेत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी यासह इतर विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
