For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बायबॅकच्या चर्चेमुळे विप्रोचे समभाग तेजीत

06:23 AM Apr 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
बायबॅकच्या चर्चेमुळे विप्रोचे समभाग तेजीत
Advertisement

एप्रिलमध्ये संचालक मंडळाची होणार बैठक

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई : आयटी कंपनी विप्रो लिमिटेड आपल्या चौथ्या तिमाहीच्या निकालांसोबत शेअर बायबॅकचा निर्णय घेणार आहे. हे पाऊल विशेष आहे कारण कंपनी तीन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आपले शेअर्स परत खरेदी करण्याच्या तयारीत आहे आणि नवीन नियम लागू झाल्यानंतरचा हा पहिलाच बायबॅक राहणार आहे.

Advertisement

तिसऱ्या तिमाहीनुसार विप्रोची रोख रक्कम सुमारे 57,394 कोटी रुपये आहे, जी आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक मानली जाते. यामुळेच कंपनीकडे बायबॅकसारखे मोठे निर्णय घेण्याची क्षमता आहे. कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ती 2026 ते 2028 या आर्थिक वर्षांदरम्यान आपल्या नफ्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक रक्कम भागधारकांना परत करेल. याच धोरणाचा एक भाग म्हणून बायबॅकचा विचार केला जात आहे.

संचालक मंडळाची बैठक कधी?

विप्रो लिमिटेडने शेअर बाजाराला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 15 आणि 16 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. या बैठकीत, कंपनी आपल्या इक्विटी शेअर्सच्या बायबॅक प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देऊ शकते. कंपनीने स्पष्ट केले आहे की, हा प्रस्ताव कंपनी कायदा 2013, सेबीचे बायबॅक नियम 2018 आणि इतर लागू नियमांनुसार असेल.

Advertisement
Tags :

.