For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या तिमाहीत विप्रोला 3200 कोटीचा नफा

06:23 AM Oct 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या तिमाहीत विप्रोला 3200 कोटीचा नफा
Advertisement

मुंबई : 

Advertisement

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रो कंपनीने 15 ऑक्टोबर रोजी यावर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीने 24,752.7 कोटींचा महसूल नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 22,697.3 कोटींच्या महसुलापेक्षा 9.1 टक्के अधिक  राहिला आहे. मात्र, महसुलात वाढ होऊनही कंपनीचा नफा 1.4 टक्क्यांनी घटला आहे. विप्रो कंपनीने या तिमाहीत 3,200.6 कोटींचा नफा नोंदवला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा नफा 3,246.2 कोटी होता. याचा सरळ अर्थ असा आहे की, कंपनीकडे नवीन प्रकल्पांमधून अधिक पैसा आला आहे, परंतु खर्चामुळे तिचा अंतिम नफा गेल्या वर्षीपेक्षा किंचित कमी आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.