For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासूनच

06:02 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासूनच
Advertisement

मुख्य सचिवांकडून आवश्यक तयारीचे निर्देश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे 10 दिवस चालणारे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी मंगळवारी केली. शालिनी रजनीश यांनी विधान परिषदेच्या सचिव ज्योती यांना पत्र पाठवून या अधिवेशनासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

15 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसीय अधिवेशनासाठी आवश्यक तयारी करावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

या अधिवेशनात प्रामुख्याने उत्तर कर्नाटकच्या विविध जिह्यांसमोरील समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये दुष्काळ, सिंचन, कृषी, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रस्ते संपर्क आणि पिण्याचे पाणी यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.