For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंगो ऑनलाईन गेमिंग अॅपवर बंदी

06:30 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
विंगो ऑनलाईन गेमिंग अॅपवर बंदी
Advertisement

सरकारची मोठी कारवाई : युजर्सच्या खात्यांमधून घोटाळे करत असल्याचे उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी कारवाई करत विंगो ऑनलाईन गेमिंग अॅप नेटवर्कवर बंदी घातली आहे. हे अॅप लाखो युजर्सच्या खात्यांमधून फसवे एसएमएस संदेश पाठवत असल्यामुळे वापरकर्ते नकळत एका मोठ्या फसवणुकीच्या नेटवर्कचा भाग बनल्याचे उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने या अॅपविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.

Advertisement

गृह मंत्रालयाच्या ‘आय4सी’ या सायबर सुरक्षा शाखेने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलद्वारे अँड्रॉइड वापरकर्त्यांना इशारा जारी केला आहे. विंगो अॅप वापरकर्त्यांच्या फोनवरून त्यांच्या नकळत फसवे एसएमएस संदेश पाठवत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय, ‘आय4सी’ आणि गृह मंत्रालयाने अॅपचा कमांड अँड कंट्रोल सर्व्हर जिओ-ब्लॉक केल्यामुळे भारतात अॅप प्रभावीपणे डिसेबल (अक्षम) झाले आहे.

चॅनेल्ससह व्हिडिओंवर बंदी

सरकारने विंगो अॅपच्या चार टेलिग्राम चॅनेल आणि 53 हून अधिक युट्यूब व्हिडिओंवर देखील बंदी घातली आहे. सदर चॅनेलचे 1.53 लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. या चॅनेल आणि व्हिडिओंद्वारे अॅपचा प्रचार केला जात होता. या कारवाईमुळे केवळ अॅप बंद होण्यास मदत झाली नाही तर एक मोठी पद्धतशीर फसवणूक देखील रोखली गेली.

सरकारचा उद्देश अन् मोठा परिणाम

गृह मंत्रालयाने केलेली ही कारवाई 1.53 लाख फसवे एसएमएस संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आली. सरकारने यापूर्वी अनेक ऑनलाईन गेमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. देशात जुगार गेमिंग अॅप्सविरुद्ध विशेषत: एक नवीन कायदा लागू करण्यात आल्यामुळे भारतात त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता, भारतात कायदेशीररित्या फक्त कौशल्य-आधारित गेमिंग अॅप्स आणि ई-स्पोर्ट्स-आधारित मोबाइल गेम खेळता येतील.

Advertisement
Tags :

.