For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंखाशिवाय उडणारे पाणघोडे

06:41 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंखाशिवाय उडणारे पाणघोडे
Advertisement

शेकडो किलो वजनाचे भरभक्कम शरीर असणारा आणि पंखही नसणारा एकादा सजीव प्राणी उडू शकतो, ही बाब आपल्या सर्वांना अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. पण संशोधकांच्या म्हणण्यानुसार पाणघोडे किंवा हिप्पोपोटेमस हे असा चमत्कार करु शकतात. एका पाणघोड्याचे वजन 1 हजार 500 ते 1 हजार 800 किलो, म्हणजे दीड ते दोन टन इतके असू शकते. मादीचे वजनही 1,300 किलो ते 1,500 किलो असू शकते. असे असूनही ते उडू शकतात, असे लंडन विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे. हा अहवाल फोर्ब्जने प्रसिद्ध केला आहे.

Advertisement

या विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी नुकताच या संबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पाणघोडे उडू शकतात. अर्थातच, त्यांचे उडणे हे पक्ष्यांप्रमाणे नसते. ते फार उंच उडू शकत नाहीत. तसेच अधिक काळ हवेत तंरगत राहू शकत नाहीत. तथापि, उडी मारल्यापेक्षा अधिक काळ ते हवेत तरंगू शकतात. त्यामुळे त्यांच्या या कृतीला केवळ उडी मारणे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ते उडतात असे म्हणणेच अधिक वास्तविक ठरेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांचे हे उडणे नेमके कसे असते, याचे वर्णनही संशोधकांनी केले आहे. पाणघेडे जमिनीवर जेव्हा त्यांच्या पूर्ण वेगात पळतात तेव्हा ते मधून मधून लांब छलांग मारतात. त्यांचा पळण्याचा अधिकतम वेग ताशी 30 किलोमीटर असतो. या वेगात पळताना त्यांची लांब उडी जवळपास 30 फूट इतकी जाते.

Advertisement
Advertisement
Tags :

.