For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एम. के. हुबळी येथील वाईनशॉपला टाळे

10:39 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
एम  के  हुबळी येथील वाईनशॉपला टाळे
Advertisement

नियमबाह्या दारूविक्री : होळेहोसूरमधील साठाही याच दुकानाचा

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना नियमबाह्यारित्या दारूची विक्री करणाऱ्या एम. के. हुबळी येथील एका वाईनशॉपला टाळे ठोकण्यात आले आहेत. रविवारी अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून बैलहोंगल तालुक्यातील होळेहोसूर येथे आढळलेला साठा याच वाईन शॉपमधून गेल्याचे उघडकीस आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बैलहोंगल व कित्तूर पोलिसांनी होळेहोसूर येथील रुद्राप्पा तोरगल याच्या घरावर छापा टाकून 99 बॉक्स दारूसाठा जप्त केला होता. शनिवारी ही कारवाई करण्यात आली होती. एका बॉक्समध्ये 90 मिलीची 100 पॅकेट्स होती. निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा कोठून आणला? याची चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. हा साठा एम. के. हुबळी येथील व्ही. एस. पट्टणशेट्टी यांच्या स्वस्तिक वाईन शॉपमधून आणल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अबकारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी अधिकारी विजयकुमार हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी एम. के. हुबळी येथील वाईनशॉपची तपासणी केली. दारूविक्रीसाठी सनद देताना नियम व अटी घातलेल्या असतात. नियमबाह्या दारूविक्री झाल्यास कारवाईचा अधिकार असतो. वाईनशॉपमध्ये एका व्यक्तीला किती बाटल्यांची विक्री करावी, याचाही नियम असतो. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात दारूसाठा पोहोचविण्यात आला होता. त्यामुळे वाईनशॉपला अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले आहेत.

चढ्या भावाने विक्रीसाठी...

Advertisement

रविवारी एम. के. हुबळी येथील वाईनशॉपमध्ये तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात स्टॉकमध्ये तफावत दिसून आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी 1740.500 लिटर दारू, 489.760 लिटर बियर असा एकूण 11 लाख 11 हजार 629 रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात दारूविक्री बंदीचा आदेश जारी केला आहे. बंदीच्या काळात चढ्या भावाने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात हा साठा होळेहोसूरमध्ये ठेवला होता.

Advertisement
Tags :

.