महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचे वारे

10:50 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, रामदुर्ग येथे प्रचार

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये यावेळी परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. सूर्य पूर्व दिशेला उगवतो हे जितके सत्य आहे, तितकेच काँग्रेस उमेदवाराचा विजय होणार हे निश्चित आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या व्याप्तीत येणाऱ्या रामदुर्ग विधानसभा मतदार संघातील मुद्देनूर, बटकुर्की, सालापूर, उदपुडी आणि कोळ्ळूर या गावांमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करुन आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने कधीही दिलेले वचन चुकविलेले नाही. विधानसभा निवडणुकी दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजना या त्याचा पुरावा आहे. या योजनेच्या माध्यमातून 1.20 कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ करुन दिला जात आहे. केवळ मतेच मागितली जात नाहीत तर गोर-गरिबांसाठी कार्य केले जात आहेत. गरिबांची भूक भागविली जात आहे. सातत्याने गोर-गरिबांच्या कल्याणाच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने कार्य केले आहे आणि यापुढेही कायम असणार आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. गेल्या 12 वर्षांपासून समाज सेवेमध्ये कार्यरत असलेला आपला मुलगा मृणाल हेब्बाळकर याने जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. कोरोना काळात व पूरस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांची मदत करून समाजसेवा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आशीर्वादाने मृणाल या निवडणुकीच्या मैदानात असून मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेस नेते प्रदीप पट्टण, केपीसीसी सदस्य राजेंद्र पाटील, सुरेश पत्तेपूर, रामण्णा बेडकी, संगाप्पा पॅटीगौडर, बेनाप्पा तिम्मापूर, निंगाप्पा बारके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article