महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियाकडून विंडीजचा व्हाईटवॉश

06:52 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विंडीजचा 86 धावांत खुर्दा, बार्टलेटला दुहेरी मुकुट

Advertisement

वृत्तसंस्था/ कॅनबेरा

Advertisement

यजमान ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजचा ‘व्हाईटवॉश’ केला. या मालिकेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात विंडीजचा केवळ 86 धावांत खुर्दा करुन ऑस्ट्रेलियाने 8 गड्यांनी आरामात विजय मिळवित ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या झेवियर बार्टलेटला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला.

या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा डाव 24.1 षटकात 86 धावात आटोपला. विंडीजच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. सलामीच्या अॅथनेजने 60 चेंडूत 2 चौकारांसह 32, कार्टीने 22 चेंडूत 10 तर चेसने 26 चेंडूत 12 धावा जमविल्या. विंडींजच्या डावात 13 अवांतर धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियातर्फे झेवियर बार्टलेटने 21 धावात 4 तर मॉरिस आणि झाम्पा यांनी प्रत्येकी 2 तसेच अॅबॉटने 1 गडी बाद केला. विंडीजच्या डावात 5 चौकार नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने केवळ 41 चेंडूत धावांचे उद्दिष्ट गाठले. ऑस्ट्रेलियाने 6.5 षटकात 2 बाद 87 धावा जमवित मालिका एकतर्फी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये सलामीच्या मॅकगर्कने 18 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 41, इंग्लिसने 16 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 35, हार्डीने 2, कर्णधार स्टिव्ह स्मिथने 1 चौकारासह नाबाद 6 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 4 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जोसेफ आणि थॉमस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील मेलबर्न येथे झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 8 गड्यांनी तर त्यानंतरचा सिडनीतील दुसरा सामना 83 धावांनी जिंकला होता. या मालिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवोदित खेळाडूंना अधिक संधी दिली होती. बार्टलेटने या मालिकेतील मेलबर्नच्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पर्दापण करताना 21 धावात 4 गडी बाद केले होते.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 24.1 षटकात सर्व बाद 86 (अथांजे 32, कार्टी 10, चेस 12, बार्टलेट 4-21, मॉरिस 2-13, झाम्पा 2-14, अॅबॉट 1-14), ऑस्ट्रेलिया 6.5 षटकात 2 बाद 87 (मॅकगर्क 41, इंग्लिस नाबाद 35, हार्डी 2, स्टिव्ह स्मिथ नाबाद 6, जोसेफ 1-30, थॉमस 1-7).

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article