महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विंडीजच्या 9 क्रिकेटपटूंबरोबर ऐतिहासिक करार

06:51 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / सेंट जोन्स

Advertisement

क्रिकेट विंडीजने 9 क्रिकेटपटूंशी अनेक वर्षांसाठी मध्यवर्ती करार करण्याचा इतिहास घडविला. या मध्यवर्ती करारामध्ये विंडीजच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

Advertisement

विंडीज पुरुष वनडे संघाचा कर्णधार अल्झारी जोसेफ तसेच वेगवान गोलंदाज शमार जोसेफ, विंडीच महिला टी-20 संघाची कर्णधार हिली मॅथ्युज आणि उपकर्णधार शिमेनी कॅम्पबेल यांच्याबरोबर विंडीज मंडळाने अनेक वर्षांसाठीच म्हणजे पुढील दोन वर्षांकरिता मध्यवर्ती करार केला आहे. विंडीज क्रिकेट मंडळाने 15 पुरुष क्रिकेटपटूंशी मध्यवर्ती करार केला असून त्यामध्ये 6 क्रिकेटपटूंबरोबर एकपेक्षा अधिक वर्षांकरिता करार केला आहे. 2023-24 च्या क्रिकेट हंगामातील क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेवूनच हा मध्यतर्वी करार इंडिज क्रिकेट मंडळाने केला आहे. विंडीज क्रिकेट मंडळाने 15 वरिष्ठ महिला क्रिकेटपटूंशी करार नुकताच केला असून त्यामध्ये 3 महिला क्रिकेटपटूंबरोबर 2 वर्षांसाठी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या जानेवारीमध्ये विंडीज क्रिकेट मंडळ आणि विंडीज क्रिकेटपटू संघटना यांच्यात सामंजस्याने चार वर्षांचा नवा करार केला होता.

दीर्घकालीन करारबद्ध खेळाडू-पुरुष-शाय हॉप, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रेनडॉन किंग, गुदाकेश मोती, जायडेन सिलेस, महिला-शिमेनी कॅम्पबेल, हिली मॅथ्युज आणि स्टिफेनी टेलर.

1 वर्ष करारबद्ध झालेले खेळाडू-पुरुष-अॅलिक अथांजे, क्रेग ब्रेथवेट, कार्टी, रॉयस्टन चेस, जोशुआ डिसिल्वा, हॉज, अकिल हुसेन, रोमारियो शेफर्ड, रोवमन पॉवेल, महिला- अलिया अॅलेनी, शमिला कॉनेल, दिनेंद्र डॉटीन, अफाय क्लेचर, चेरी अॅन फ्रेजर, चिनेली हेन्री, झायदा जेम्स, क्विना जोसेफ, अशमिनी मुनीसेर, चिडेन नेशन, करिश्मा रामहॅरेक आणि रशिदा विलियम्स

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article