अधिक धावा न केल्याने विंडीजचा पराभव; होप
वृत्तसंस्था, कोलकाता
पांत्य फेरी गाठली. या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार संजू सॅमसनच ठरला. दरम्यान या सामन्यात विंडीज संघाला सुरूवातीला अधिक धावा जमविता न आल्याने पराभवला सामोरे जावे लागले, अशी प्रतिक्रिया विंडीजचा कर्णधार शाय होपने पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर पडेल, या दृष्टिकोनातून दोन्ही संघांनी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सावधानता बाळगत मार्गक्रमन केले. भारताने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. इडन गार्डनच्या खेळपट्टीवर सुरूवातीला फलंदाजीस अनकुल असताना त्याचा लाभ विंडीजच्या फलंदाजांना घेता आला नाही. त्यानंतर विंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत भारताला 196 धावांचे आव्हान दिले. पण सलामीचा फलंदाज संजू सॅमसनने एका बाजुने धावफलक हलता ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. त्याने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात विजयाचे श्रेय भारताला द्यावेच लागेल. पण या खेळपट्टीवर विंडीजचे फिरकी गोलंदाज म्हणावे तसे प्रभावी ठरु शकले नाहीत. धावांचा पाठलाग करताना अकिल हुसेन आणि गुदाकेश मोती यांनी भारतीय फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखू शकले नाहीत. विंडीजने या स्पर्धेत निश्चितच चांगली कामगिरी केली पण दुर्दैवाने आपल्या संघाला उपांत्य फेरीपूर्वीच बाहेर पडावे लागले, असेही कर्णधार होपने सांगितले.