For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजचा 450 धावांचा डोंगर

06:05 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीजचा 450 धावांचा डोंगर
Advertisement

ग्रिव्सचे नाबाद शतक : बांगलादेश 2 बाद 40

Advertisement

वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड (अँटिग्वा)

बांगलादेशविरुद्ध येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान विंडीजने आपला पहिला डाव 9 बाद 450 धावांवर घोषित केला. त्यानंतर दिवस अखेर बांगलादेशने पहिल्या डावात 2 बाद 40 धावा केल्या.

Advertisement

या सामन्यात विंडीजने 5 बाद 250 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. लुईसने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 97, अॅथनेझने 130 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 90 तसेच जस्टिन ग्रिव्सने 206 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 115 धावा झळकाविल्या. केमर रॉचने 2 चौकारांसह 47, हॉजने 2 चौकारांसह 25, डिसिल्व्हाने 2 चौकारांसह 14, सिल्सने 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 आणि जोसेफने 2 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. विंडीजने आपला पहिला डाव 144.1 षटकात 9 बाद 450 धावांवर घोषित केला. बांगलादेशतर्फे हसन मेहमुदने 87 धावात 3, तस्किन अहमदने 76 धावांत 2, कर्णधार मेहिदी हसन मिराजने 99 धावांत 2 आणि तैजुल इस्लामने 111 धावांत 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये 20 षटकात 2 बाद 40 धावांपर्यंत मजल मारली. सलामीचा मेहमुदुल हसन जॉय केवळ 5 धावांवर तर झाकीर हसन 15 धावांवर बाद झाले. मोमिनुल हक 7 तर शहदात हुसेन 10 धावांवर खेळत आहे. विंडीजतर्फे सिल्स आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव 144.1 षटकात 9 बाद 450 डाव घोषित (ग्रिव्स नाबाद 115, लुईस 97, हॉज 25, अॅथनेझ 90, डिसिल्व्हा 14, रॉच 47, सिल्स 18, शमार जोसेफ 11, अवांतर 25, हसन मेहमूद 3-87, टी. अहमद 2-76, मेहिदी हसन मिराझ 2-99, टी. इस्लाम 1-111), बांगलादेश प. डाव 20 षटकात 2 बाद 40 (हसन जॉय 5, झाकिर हसन 15, मोमिनुल हक खेळत आहे 7, शहदात हुसेन खेळत आहे 10, अवांतर 3, सिल्स 1-15, अल्झारी जोसेफ 1-2).

Advertisement
Tags :

.