For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणांचा आवाज असणाऱ्या मृणाल हेब्बाळकरांना विजयी करा

10:55 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
तरुणांचा आवाज असणाऱ्या मृणाल हेब्बाळकरांना विजयी करा
Advertisement

आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे रोजी मतदान होणार असून मतदारांनी न चुकता मतदान करून उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ शिवबसवनगर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हिंडलगा येथील टीचर्स कॉलनी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस सरकारकडून जनहिताच्या योजना राबवून सर्वांनी विकास साधण्याला प्राधान्य दिले आहे. लोकसभेमध्ये तरुणांचा आवाज उमटविण्यासाठी मृणाल हेब्बाळकरांना लोकसभेत पाठवून देणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ यांनी काँग्रेस सरकारच्या जनहिताच्या योजनांची माहिती देऊन मृणाल हेब्बाळकर यांना लोकसभेवर निवडून  जनसेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, उच्चशिक्षित तरुण असल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांसमवेत स्थानिक नेते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.