For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ 90 मिनिटे झोपून लाखो रुपये जिंका

06:09 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
केवळ 90 मिनिटे झोपून लाखो रुपये जिंका
Advertisement

जर तुम्हाला केवळ 90 मिनिटे झोपल्यावर लाखो रुपये मिळतील असे सांगण्यात आले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु जपानमध्ये अशीच अनोखी स्पर्धा आयोजित होत असून यात लोकांना धावणे, उड्या मारणे किंवा कुठलेही अवघड काम करावे लागणार नाही. केवळ बेडवर पहडून चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या स्पर्धेचे नाव ‘मॅटरेस बाय कोआला’ आहे. यात सुमारे 90 मिनिटांपर्यंत स्पर्धकांच्या झोपेला उपकरणाने मॉनिटर केले जाणार आहे. स्पर्धेच्या सर्वंकष विजेत्याला 222 लाख येन म्हणजेच 13.7-13.8 लाख रुपयांचे इनाम मिळणार आहे.

Advertisement

केवळ डोळे बंद करणे पुरेसे नाही

या स्पर्धेत केवळ बेडवर पहडून डोळे बंद करणे पुरेसे नाही. तुमची झोप किती चांगली राहते हे खरे आव्हान असेल. स्पर्धकांना स्लीप-ट्रॅकिंग डिव्हाइस घातले जाणार आहे. याच्या माध्यमातून ते किती लवकर झोपले, झोप किती गाढ होती, झोपेची गुणवत्ता कशी राहिली आणि पूर्ण 90 मिनिटांच्या कालावधीत झोप किती स्थिर राहिली हे पाहिले जाणार आहे. या वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावर एक खास ‘स्लीप स्कोर’ तयार केला जाईल. याच स्कोरच्या आधारावर स्पर्धेच्या विजेत्याचा निर्णय होईल. आयोजकांनुसार या स्कोरिंग सिस्टीमला मेडिकल सुपरव्हिजनमध्ये तयार करण्यात आले आहे.

Advertisement

झोपण्यापूर्वीची तयारी

ही स्पर्धा इतकी देखील सोपी नाही की येताच बेडवर पहुडले आणि झोपी गेले. स्पर्धेपूर्वी स्पर्धकांसाठी खास ‘इनसोमनिया एक्सरसाइज’ तसेच झोपेत जाण्याची तयारी असणारे ‘इनस्लीप एक्सरसाइज’ म्हणजेच ‘इनमिन टायसो’सारखी तयारी करविण्यात येणार आहे. याचा उद्देश स्पर्धकांना रिलॅक्स करत झोपेसाठी तयार करणे आहे. याचबरोबर स्पर्धकांना वेगवेगळे ‘स्लीप आयटम’ देखील देण्यात येतील. या गोष्टींचा उद्देश झोपेच्या अनुभवनात वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण करणे आहे.

झोपतेवेळी ‘स्लीप डिस्टर्बंस’

स्पर्धक आरामात झोपत असतील, तेव्हा त्यांच्यासमोर अचानक काही ‘स्लीप डिस्टर्बंस’ म्हणजेच झोपेत अडथळे आणणाऱ्या स्थिती निर्माण केल्या जातील. याचा उद्देश कोणता व्यक्ती अशा अडथळ्यांनंतरही स्वत:च्या झोपेला चांगल्याप्रकारे कायम राखू शकतो हे पाहणे आहे. म्हणजेच येथे केवळ लवकर झोपी जाणे पुरेसे नाही. जर एखादा व्यक्ती काही आवाज किंवा अन्य समस्येमुळे त्वरित जागा झाल्यास त्याची झोप प्रभावित होऊ शकते.

ही पूर्ण स्पर्धा 5 ऑक्टोबर 2026 रोजी टोकियोच्या शेअर ग्रीन मिनामी आओयामामध्ये आयोजित होईल. दिवसभरात एकूण तीन स्पर्धा होतील आणि प्रत्येक स्पर्धेत सुमारे 20 जण सहभागी होतील. प्रत्येक स्पर्धेत वास्तविक झोपेची स्पर्धा 90 मिनिटांची असेल. यात आयोजन आणि प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळही सामील असणार आहे.

 अनेकांना मिळणार इनाम

या स्पर्धेत सर्वंकष विजेत्याला 222 लाख येनचा मुख्य पुरस्कार देण्यात येईल. याचबरोबर झोपेच्या वेगवेगळ्या पैलूंसाठी विशेष पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. अत्यंत गाढ झोप घेणाऱ्या स्पर्धकासाठी ‘डीप स्लीप अवॉर्ड’ आणि खास किंवा वेगळ्या झोपेच्या पोझिशनसाठी ‘स्लीप फ्लिप अवॉर्ड’ यासारख्या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत.

कोण घेऊ शकतो भाग?

या स्पर्धेत सामील होण्यासाठी वय कमीतकमी 20 वर्षे असणे आवश्यक आहे. खास बाब म्हणज्चेच स्पर्धेत फायदा मिळावा म्हणून जाणूनबुजून पूर्ण रात्र जागणे किंवा गरजेपेक्षा अधिक झोप रोखण्याची अनुमती नाही. याचबरोबर झोप घेणाऱ्यांना स्लीपिंग पिल किंवा झोप सुधारणाऱ्या औषधांचा वापर करून स्पर्धेत भाग घेण्याची अनुमती नाही.

Advertisement
Tags :

.