विम्बल्डन आजपासून
अल्कारेझ, सिनर, गॉफ, साबालेन्कावर लक्ष
वृत्तसंस्था/ लंडन
कार्लोस अल्कारेझ आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत सेंटर कोर्टवर पहिल्या फेरीत फॅबियो फोग्निनीचा सामना करून सलग तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदासाठी आपला प्रयत्न सुरू करेल आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम 18 सामने सलग जिंकण्याची मालिका अबाधित ठेवण्याचा इरादा बाळगेल.
या ग्रास कोर्ट ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी एकेरी गटातील सामने ड्रॉमध्ये निश्चित करण्यात आले असून त्यातून पुऊषांच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रमांक 1 जॅनिक सिनर विऊद्ध क्रमांक 7 लोरेन्झो मुसेट्टी, क्रमांक 4 जॅक ड्रॅपर विऊद्ध क्रमांक 6 नोवाक जोकोविच, क्रमांक 2 अल्काराज विऊद्ध क्रमांक 8 होल्गर ऊने आणि क्रमांक 3 अलेक्झांडर झ्वेरेव्ह विऊद्ध क्रमांक 5 टेलर फ्रिट्झ असे सामने रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. जोकोविचने त्याच्या 24 पैकी 7 किताब या ऑल इंग्लंड क्लबमध्ये जिंकले आहेत.
महिला उपांत्यपूर्व फेरीत क्रमांक 1 आर्यना साबालेन्का विऊद्ध क्रमांक 6 मॅडिसन कीज आणि क्रमांक 4 जास्मिन पाओलिनी विऊद्ध क्रमांक 5 झेंग किनवेन, क्रमांक 2 कोको गॉफ विऊद्ध क्रमांक 8 इगा स्वायटेक किंवा 2022 ची चॅम्पियन एलेना रायबाकिना आणि क्रमांक 3 जेसिका पेगुला विऊद्ध क्रमांक 7 मीरा अँड्रीवा असे सामने रंगण्याची शक्यता दिसत आहेत.
सिनर, जोकोविच, ड्रेपर आणि 2024 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या मुसेट्टीच्या दहाव्या क्रमांकावरील बेन शेल्टन आणि 13 व्या क्रमांकावरील अमेरिकेचा टॉमी पॉल, कझाकस्तानचा अंडरआर्म सर्व्हिंग खेळाडू अलेक्झांडर बुब्लिक यांचाही पुरुषांच्या गटात समावेश आहे. बुब्लिकचा तिसऱ्या फेरीतील संभाव्य प्रतिस्पर्धी ड्रेपर ठरू शकतो. त्याने ड्रेपरला हरवून फ्रेंच ओपनमध्ये त्याची पहिली मोठी क्वार्टरफायनल फेरी गाठली होती आणि नंतर दुसऱ्यांदा जर्मनीतील हॅले येथे ग्रास-कोर्ट जेतेपद जिंकताना सिनरला हरवले होते.
अल्काराझ आणि सिनर फक्त 13 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडू शकतात. तसे झाल्यास ती फ्रेंच ओपनमधील जेतेपदासाठीच्या लढतीची पुनरावृत्ती असेल. प्रेंच ओपनमधील सदर लढत 22 वर्षीय अल्काराझने जिंकून त्याचा पाचवा प्रमुख चषक पटकावला होता. फोग्निनीच्या रुपाने अल्काराझचा सामना एका 38 वर्षीय अनुभवी खेळाडूशी होईल, ज्याला 9 वे मानांकन मिळाले आहे आणि 2011 मध्ये तो फ्रेंच ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला होता. पण सध्या तो जागतिक क्रमवारीत 130 व्या क्रमांकावर आहे आणि विम्बल्डनमध्ये मागील 14 सामन्यांमध्ये तो कधीही तिसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकलेला नाही.
दुसरीकडे, गॉफ फ्रेंच ओपनमधील जेतेपदानंतर मंगळवारी विम्बल्डनची सुऊवात 2024 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या दयाना यास्ट्रेमस्काविऊद्ध करेल. हा सामना जिंकल्यास गॉफची गाठ दुसऱ्या फेरीत माजी अव्वल खेळाडू आणि दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काशी पडू शकते, तर तिसऱ्या फेरीत 28 व्या क्रमांकावर असलेल्या सोफिया केनिनशी पुन्हा सामना होऊ शकतो. केनिनने दोन वर्षांपूर्वी विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत गॉफला पराभूत केले होते. तीन आठवड्यांपूर्वी रोलँ-गॅरोमध्ये उपविजेती ठरलेली साबालेन्का कॅनेडियन क्वालिफायर कार्सन ब्रान्स्टाइनविऊद्धच्या सामन्याने सुऊवात करेल.