इंडिगोच्या सीईओपदी विलियम वॉल्श यांची नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली:
भारतातील सर्वात मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगोच्या सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) पदी विलियम वॉल्श यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटीश एअरवेजचे ते माजी प्रमुख आहेत. सदरच्या निवडीबाबत नियामकाची मंजूरी मिळणे बाकी आहे. वॉल्शऑगस्टमध्ये आपल्या पदाचा कार्यभार सांभाळू शकतात.
विलियम वॉल्श हे अनुभवी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व असून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे (इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन)चे संचालक आहेत. इंडिगोकडून मिळालेल्या माहितीनुसार वॉल्श यांचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचा कार्यकाळ 31 जुलै रोजी संपत आहे. 3 ऑगस्टपासून ते इंडिगोच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहेत. यापूर्वी ते ब्रिटीश एअरवेज आणि इंटरनॅशनल एअरलाईन्स ग्रुपचे सीईओ राहिले आहेत.
काय म्हणाले एमडी इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटीया म्हणाले की, कंपनी सध्या विकास आणि बदलाच्या नव्या पर्वामध्ये प्रवेश करत असून या कार्यामध्ये विलियम वॉल्श यांचाही हातभार भविष्यात ागणार असून त्यांचे आम्ही कंपनीत जंगी स्वागत करतो. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा कंपनीला येणाऱ्या काळात निश्चितच फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.