सर्वांना सोबत घेऊन काम करणार : विक्रांत सावंत
वेत्येत गुणाजी गावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा
न्हावेली /वार्ताहर
मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावायचा आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन मला काम करायचे आहे. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहा,अशी साद भाजपचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी कार्यक्रमात वेत्ये येथील कार्यक्रमात उपस्थित मतदारांना दिली. गुणाजी गावडे मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी "राजा शिवाजी" या मराठी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. सावंत बोलत होते.जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना श्री. सावंत म्हणाले की, “आजवर मला मिळालेले यश आणि जनतेचे प्रेम हे केवळ तुमच्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे. माझ्या प्रत्येक यशाचे खरे श्रेय मतदारसंघातील जनतेचे आहे." मतदारसंघातील पायाभूत सुविधा, तरुणांचे प्रश्न आणि स्थानिक विकास कामांना गती देण्यासाठी भाजप नेत्यांच्या माध्यमातून एक भक्कम आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन, कोणालाही मागे न सोडता मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,असे सांगत सावंत यांनी विकासाची ही घोडदौड अशीच पुढे सुरू राहील अशी ग्वाही दिली.त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.याप्रसंगी गुणाजी गावडे,जितेंद्र गावकर महेश गावडे,गुरुदास गावकर,बाबुराव तेंडुलकर,गोविंद गावडे,सुनील गावडे आणि विराज गावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.