For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Eknath Shinde : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

04:36 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
eknath shinde   रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणार   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Advertisement

                 उमरगा–लोहारा तालुक्यातील सभेत एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका

Advertisement

उमरगा :  उमरगा–लोहारा तालुक्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जेवळी येथे आयोजित सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली. “रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेसाठी काम करणे हीच माझी भूमिका आहे” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही. तसेच उस्मानाबादचे धाराशिव नामांतरण, सिंचनाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना, आणि जिल्ह्यातील एकही युवक रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाणार नाही, अशी विकासात्मक दृष्टी त्यांनी मांडली.

Advertisement

लोहारा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यात येणार असून त्यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून विकासाचा वेग अधिक वाढवला जाईल, असेही ते म्हणाले.

या सभेला पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी खासदार रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.