For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हॉट्स अॅप होणार पेड ?

06:22 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हॉट्स अॅप होणार पेड
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हे अॅप आता पेड होणार आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत असलेले हे मेसेजिंग अॅप लवकरच सबस्क्रिप्शन स्वरुपात बदलू शकते. मेटा कंपनी यासाठी नवीन प्लॅनवर काम करत आहेत. युजर्संना त्यामुळे जाहिरात मुक्त अनुभवासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम काही प्रमाणात होऊ या अॅपच्या भविष्यातील वापराला काहीसा ब्रेक लागू शकतो. व्हॉट्स अॅपच्या स्टेटस आणि चॅनेल्स विभागात जाहिराती दाखवण्याची तयारी मेटाने केली आहे. नव्या सबस्क्रिप्शन मॉडेलचे संकेत 2.26.3.9 या बीटा व्हर्जन कोडमध्ये दिसून आले आहे. व्हॉट्स अॅप वापरावेळी तुम्हाला जाहिराती नको असतील तर कंपनीचा ठराविक प्लॅन विकत घ्यावा लागेल, अशी मेटा कंपनीची नवी पॉलिसी असेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.