६६ व्या वर्षी हा गायक चौथ्यांदा चढणार बोहल्यावर ?
मुंबई
प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक लकी अली यांनी वयाच्या ६६ व्या चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे १८ व्या कथाकार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लकी अली यांनी चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा असल्यासचे व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमात लकी अली यांनी आपल्या आवाजाच्या जादू प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात लकी अली यांनी गायनासोबत अनेक हिट गाण्यांच्या मागच्या मनोरंजक कथा देखील सांगितल्या.
याप्रसंगी लकी अली यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुन्हा विवाह बंधनात अडकावं असं माझं स्वप्न आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर एकच चर्चा रंगली.
लकी अली आजपर्यंत तीन वेळा विवाहबंधनात अडकले आहेत. पण तीन ही वेळा त्यांच्या नाते काही फार दिवस टिकले नाही.
लकी अली यांची पहिली पत्नी मेगन जेन हिच्याशी १९९६ मध्ये लग्न केले. हे नाते काही फार काळ टिकले नाही. त्यानंतर २००० साली अनाहिता यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर अनाहिता यांनी धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्विकारला. त्यांनी इनाया असे नाव बदलले. या लग्नापासून लकी अली आणि इनाया यांना दोन मुले झाली.
दुसऱ्या घटस्फोटानंतर लकी अली यांनी २०१० मध्ये एलिझाबेथ हलमशी लग्न केले. परंतु २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. लकी अली यांची तिसरी पत्नी त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. त्यांना या लग्नातून एक मुलगाही आहे.