For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजच्या बैठकीत अगरबत्ती प्रकल्पाबाबत चर्चा होणार का?

11:09 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजच्या बैठकीत अगरबत्ती प्रकल्पाबाबत चर्चा होणार का
Advertisement

बंद पडलेले प्रकल्प नव्याने सुरू करून पूर्णत्वाला नेण्यात येणार का? : महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीकडे शहरवासियांचे लक्ष

Advertisement

बेळगाव : महापालिकेतर्फे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र, काही प्रकल्प उद्घाटन करून त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला आहे. मात्र प्रत्यक्षात अगरबत्ती प्रकल्प उद्घाटनानंतर बंदच आहे. त्याबाबत बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक चर्चा करणार का? हे पहावे लागणार आहे. महापालिकेची सर्वसाधारण बैठक बुधवार दि. 27 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. अधिवेशनामुळे बैठक झाली नव्हती. मात्र, अधिवेशनानंतर स्थायी समितीच्या बैठकी झाल्या. त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करून ठराव मांडण्यात आले आहेत. त्या ठरावांवर आजच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये चर्चा करून ठराव मंजूर करण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत. सफाई कामगार भरतीही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मात्र सामंजस्याने हा प्रश्न दूर करण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये आता इतर प्रश्नांवर चर्चा करून निकाली काढण्यात येणार आहेत का? हे पहावे लागणार आहे. याचबरोबर काही बंद पडलेले प्रकल्प नव्याने सुरू करून पूर्णत्वाला नेण्यात येणार आहेत का? हे देखील पहावे लागणार आहे. विविध प्रकल्पांना लाखो रुपये खर्च केले गेले आहेत. मात्र काही प्रकल्प उद्घाटनानंतर बंदच आहेत. त्याबाबत कोणता निर्णय घेणार, हे पहावे लागणार आहे.

बायोगॅस प्रकल्पाचे 2 जानेवारीला उद्घाटन

Advertisement

एपीएमसीमध्ये बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे. केवळ एकमेव प्रकल्प पूर्णत्वाला आला आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून नगर विकास मंत्री सुरेश भैरती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.