For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

80 अब्ज डॉलर्सच्या परकीय गुंतवणुकीचा रुपयाला फायदा?

07:00 AM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
80 अब्ज डॉलर्सच्या परकीय गुंतवणुकीचा रुपयाला फायदा
Advertisement

भारतीय गुंतवणुकीचा समावेश : आरबीआय, केंद्र सरकार यांच्या निर्णयाचा परिणाम येत्या काही महिन्यांत दिसण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतातील 80 अब्ज डॉलर्सच्या परकीय गुंतवणुकीमुळे रुपयाला फायदा होणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि केंद्र सरकार यांनी अलीकडेच घेतलेल्या निर्णयांचा परकीय गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम येत्या काही महिन्यांत दिसून येऊ शकतो. बाजार तज्ञांच्या मते, या निर्णयामुळे देशात परकीय भांडवलाचा ओघ वाढेल, ज्यामुळे भारताची व्यवहाराची स्थिती मजबूत होत, याचा भारतीय रुपयाला आधार मिळण्याची दाट शक्यता आहे. आरबीआयने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अलीकडेच आरबीआयने परकीय चलन अनिवासी ठेवींना प्रोत्साहन देण्यासाठी काही सवलत दिली आहे. याअंतर्गत, या ठेवींवरील हेजिंग खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, बँकांना एनआरआय ग्राहकांना आकर्षक व्याजदर देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनाही परदेशी बाजारातून कर्ज उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

Advertisement

परदेशी गुंतवणूकदारांना करमाफी

परदेशी कर्ज गुंतवणूकदारांसाठी एक मोठे पाऊल म्हणून, सरकारने विथहोल्डिंग टॅक्स 20 टक्क्यांवरून शून्यावर आणला आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय कर्ज बाजारात गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक ठरू शकते. आर्थिक वर्ष 2027 मध्ये 75-80 अब्ज डॉलरची गुंतवणूक ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार, आरबीआय आणि सरकारच्या या पावलांमुळे आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारतात 75 ते 80 अब्ज डॉलरची अतिरिक्त विदेशी गुंतवणूक होऊ शकते. जर भारताचा कोणत्याही जागतिक बॉण्ड निर्देशांकात समावेश झाला, तर 15 ते 20 अब्ज डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक देखील होऊ शकते. अहवालानुसार, जर आर्थिक वर्ष 2027 मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 95 डॉलर राहिली, तर भारताची चालू खात्यातील तूट सुमारे 87 अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या 2.1 टक्के असू शकते. तथापि, भांडवली खात्यात सुमारे 80 अब्ज डॉलरची शिल्लक राहील असा अंदाज आहे, जी चालू खात्यातील तुटीची मोठ्या प्रमाणात भरपाई करू शकते.

Advertisement
Tags :

.